Top Recommended Stories

Andhra Pradesh Accident: लग्नावरुन परतताना कारला आंध्रप्रदेशमध्ये भीषण अपघात, 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Andhra Pradesh Accident: अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावर कोटलापल्ली गावाजवळ या कारला समोरुन येणाऱ्या भरधाव लॉरीने जोरदार धडक दिली.

Published: February 7, 2022 12:22 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Andhra Pradesh Accident
Andhra Pradesh Accident

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशमध्ये (Andra Pradesh) रविवारी रात्री उशिरा भीषण अपघाताची (Andhra Pradesh Acciden) घटना घडली असून यामध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लग्नावरुन (Marriage) परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावर (Anantpuram-Bellari National Highway) कोटलापल्ली गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या लॉरीने कारला जोरदार धडक (Lorry-Car Accident) दिली. या अपघातामध्ये कारचा चुराडा झाला आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांना कारमधून काढणे सुद्धा कठीण झाले होते.

Also Read:

You may like to read

मिळालेल्या माहितीनुसार, उरवाकोंडा येथे राहणारे काही जण इनोव्हा कारने कर्नाटकातील (Karnataka) बेल्लारी येथे लग्नासाठी गेले होते. लग्न आटपून परत येत असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावर कोटलापल्ली गावाजवळ या कारला समोरुन येणाऱ्या भरधाव लॉरीने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Andhra Pradesh Police) घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरु केले. अपघातामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान या व्यक्तीचा देखील मृत्यू झाला. अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 7, 2022 12:22 PM IST