Infosys Recruitment 2022: आयटी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, इन्फोसिस देणार 55 हजारांपेक्षा जास्त नोकऱ्या!

Infosys Recruitment 2022: इन्फोसिस कंपनी सध्या आपल्या जागतिक पदवीधर भरती कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. त्याअंतर्गत 55,000 नवीन नोकर भरती करण्यात येणार आहे.

Published: January 13, 2022 1:55 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Infosys Recruitment 2022
Infosys Recruitment 2022

Infosys Recruitment 2022 : आयटी क्षेत्रात (IT Field) नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने (IT Company Infosys) अनेक पदांसाठी भरती करण्याबाबत घोषणा केली आहे. तब्बल 55 हजारांपेक्षा जास्त नोकर भरती (Infosys Recruitment 2022) इनफोसिस कंपनीद्वारे करण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसर्‍या तिमाहीसाठी 5,809 कोटी रुपयांचा नफा घोषित केल्यानंतर इन्फोसिस कंपनीने पदवीधर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Also Read:

इन्फोसिस कंपनीने सांगितले की, कंपनी सध्या आपल्या जागतिक पदवीधर भरती कार्यक्रमाचा (Infosys Recruitment Drive 2022) विस्तार करण्याचा विचार करत आहे. 55,000 नवीन नोकर भरती करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. इन्फोसिस कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय (Nilanjan Roy, Chief Financial Officer, Infosys) यांनी सांगितले की, देशातील प्रतिभा, कौशल्य यांना प्रोत्साहन देण्यावर इन्फोसिस भर देत आहे. याला आणखी उत्तम करण्यासाठी कंपनी गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनी ग्लोबल हायरिंग प्रोग्राम अंतर्गत 55 हजार किंवा त्यापेक्षा जास्त पदांची भरती करणार आहे.’

अहवालानुसार, डिसेंबर 2021 पर्यंत इन्फोसिसमध्ये एकूण कर्मचारी संख्या 2,92,067 होती. ही कर्मचारी संख्या मागील तिमाहीत 2,79,617 आणि डिसेंबर 2020 पर्यंत 2,49,312 होती. याचा अर्थ प्रत्येक वर्षात ही कर्मचारी संख्या वाढत गेली आहे. इन्फोसिस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांची संख्या 39.6 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. इन्फोसिस कंपनीचा नफा 5,197 कोटींवरुन 5,809 कोटी रुपयांवर पोहचला आहे.

दरम्यान, इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलील पारेख (Salil Parekh, CEO and MD of Infosys) यांनी सांगितले की, ‘कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यावर भर दिला जाईल. या अंतर्गत आम्ही ग्राहकांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे कर्मचारी आणखी कुशल बनवण्यावर भर देत आहोत. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या हिताचाही आमच्या प्राधान्यक्रमात समावेश आहे.’ इन्फोसिस कंपनीने नोकर भरतीसंदर्भात घोषणा केल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या फ्रेशर्सला खूप आनंद झाला आहे. या माध्यमातून त्यांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 13, 2022 1:55 PM IST