Aadhaar Card Latest Update: UIDAI ने मार्केटमधून बनवलेले PVC कार्ड ठरवले अवैध, जाणून घ्या आता आधार कार्डधारकांनी काय करावे?
आधार कार्डबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. UIDAI ने बाजारातून काढलेली PVC आधार कार्डची प्रिंट आऊट अवैध असल्याचे घोषित केले आहे. UIDAI ने ट्विट करून बाजारातून बनवलेले PVC आधार कार्ड अवैध असल्याची माहिती दिली आहे.

Aadhaar Latest News, PVC Aadhaar Card : आधार कार्डबाबत एक मोठी बातमी समोर येत (Aadhaar Card Latest Update) आहे. UIDAI ने बाजारातून काढलेली PVC आधार कार्डची प्रिंट आऊट अवैध असल्याचे घोषित केले आहे. UIDAI ने ट्विट करून बाजारातून बनवलेले PVC आधार कार्ड अवैध असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता केवळ UIDAI द्वारे जारी केलेले PVC आधार कार्डच (Aadhaar PVC Card) वैध असणार आहे. कोणतीही व्यक्ती 50 रुपये शुल्क भरून पीव्हीसी आधार कार्ड (PVC Aadhaar Card) मिळवू शकते. यामध्ये जीएसटी आणि पोस्टल शुल्क देखील समाविष्ट आहे.
Also Read:
सध्या देशात आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे. सर्व महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्डचा वापर आवश्यक करण्यात आहे. त्यामुळे तुम्ही जर मार्केटमधून PVC आधार कार्डची प्रिंट आउट घेतली असेल तर ती ग्राह्य धरली जाणार नाहीये. तुम्हाला नवे पीव्हीसी आधार कार्ड हवे असेल तर UIDAI मध्ये नवीनसाठी अर्ज करावा लागेल आणि नवीन PVC कार्ड घ्यावे ज्याला UIDAI ने मान्यता दिली आहे. UIDAI ने जारी केलेल्या पीव्हीसी आधार कार्डचे काही वैशिष्ट्ये देखील आहेत.
UIDAI ने जारी केलेल्या PVC कार्डाची सुरक्षा वैशिष्ट्ये
काही दिवसांपूर्वी UIDAI ने PVC आधार कार्ड जारी केले होते. ते एटीएम, ऑफिस आयडी कार्ड किंवा डेबिट कार्डच्या आकाराचे होते. त्यामुळे ते खिशात किंवा पर्समध्ये ठेवणे सोपे जाते. यात सर्व सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही PVC आधार कार्डमधील QR कोड स्कॅन करून तुमची ओळख तत्काळ सत्यापित करू शकता. पण काही लोक त्यांच्या सोयीसाठी UIDAI कडून PVC आधार कार्ड घेण्याऐवजी बाजारातून प्रिंट काढून स्वत:कडे ठेवण्यास सुरुवात केली. मात्र आता UIDAI ने हे मार्केटमधून बनवलेले पीव्हीसी आधार कार्ड अवैध ठरवले आहे.
#OrderAadhaarPVC#Aadhaar PVC card is more durable and convenient to carry, and it is just as valid as Aadhaar Letter and #eAadhaar.
To order your Aadhaar PVC online, click https://t.co/G06YuJBrp1#OrderAadhaarOnline#OrderPVC pic.twitter.com/PN6IyvObyK— Aadhaar (@UIDAI) January 19, 2022
बाजारातून घेतलेल्या प्रिंट आउटमध्ये कोणतीही सुरक्षा फीचर्स नाहीत
बाजारातून घेतलेल्या आधार कार्डांमध्ये कोणत्याही प्रकारचे सुरक्षा वैशिष्ट्ये नसतात आणि ती असुरक्षित असतात. त्यामुळेच UIDAI ने आता खुल्या बाजारातून बनवून घेतेली PVC आधारची प्रत न वापरण्याचा सल्ला दिला आहे. UIDAI ने ट्विटमध्ये म्हटले आहे की “आम्ही बाजारातून PVC आधारची कॉपी वापरण्यास समर्थन देत नाही, कारण त्यात कोणतीही सुरक्षा वैशिष्ट्ये नाहीत. तुम्ही 50 रुपये (GST आणि स्पीड पोस्ट शुल्कासह) भरून आधार PVC कार्ड ऑर्डर करू शकता.”
जाणून घ्या कोणत्या कार्डाला आहे मान्यता
UIDAI ने सांगितले की uidai.gov.in वरून डाउनलोड केलेले आधार किंवा M-आधार (M-Aadhaar) प्रोफाइल किंवा UIDAI द्वारे जारी केलेले आधार PVC कार्ड हेच आधार कार्डशी (Aadhaar Card) संबंधित कामासाठी वापरण्यास मान्यता आहे. बाजारातून घेतलेल्या प्रिंट आउटला मान्यता नाही कारण त्यात कोणतीही सुरक्षा फीचर्स नसतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या