Aadhaar Card Mobile Number Update: आधार कार्डमध्ये असा अपडेट करा नवीन मोबाइल नंबर, फॉलो करा या स्टेप्स
Aadhaar Card Mobile Number Update: आधार कार्ड हे देशभरातील सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी आधार कार्ड आवश्यक असते आणि ते ओळखपत्र म्हणून देखील अनेक ठिकाणी वापरले जाते.

Aadhaar Card Mobile Number Update: आधार कार्ड हे देशभरातील सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक असते आणि ते ओळखपत्र म्हणून देखील अनेक ठिकाणी वापरले जाते. आधार कार्डमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, फोटो आणि बायोमेट्रिकसह अनेक वैयक्तिक माहिती (aadhaar Card Update) असते. अशा परिस्थितीत जर तुमचा (ID Proof) आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर चुकला असेल किंवा बदलला असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. येथे आम्ही तुम्हाला Aadhaar Card मध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा ते सांगत आहोत. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया….
Also Read:
- Aadhaar-PAN Link : आधार-पॅन लिंक केले नसेल तर लवकर करा, 30 जूननंतर द्यावे लागतील 1000 रुपये!
- Post Office Yojana: पोस्टाच्या या योजनेत गुतवणूक करून मिळवा दुप्पट परतावा; जाणून घ्या काय आहे योजना?
- Aadhaar Card Latest News: आता रजिस्टर्ड नसलेल्या मोबाइल क्रमांकावर देखील डाउनलोड करू शकतात आधार कार्ड, जाणून घ्या स्टेप्स..
Aadhaar Card मध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करावा?
- Aadhaar Card मध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम https://uidai.gov.in/ वेबसाइटवर जा.
- तिथे तुम्हाला फोन नंबर अपडेट करण्याचा पर्याय मिळेल, येथे तुम्हाला जो नंबर अपडेट करायचा तो नंबर टाका.
- त्यानंतर सुरक्षा कोड म्हणजेच कॅप्चा टाइप करा.
- OTP च्या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
- त्यानंतर OTP सबमिट करा आणि प्रोसीड करा.
- यानंतर तुम्हाला एक मेनू दिसेल. जो ऑनलाइन आधार सर्व्हिसेसची नोंद करतो.
- येथे तुम्हाला नाव, पत्ता, ईमेल, मोबाईल नंबर यासह इतर अनेक पर्याय दिसतील.
- यामधून मोबाईल नंबरचा पर्याय निवडा आणि विचारलेले सर्व तपशील भरा.
- त्यानंतर कॅप्चा प्रविष्ट करा आणि कंटीन्यू बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो व्हेरिफाय करा आणि Save and Proceed च्या बटणावर क्लिक करा.
आधार अपडेटची दुसरी पद्धत
- Aadhaar Card मध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या नावनोंदणी किंवा अपडेट केंद्राला भेट देऊ शकता.
- जिथे तुम्हाला आधार कार्डमध्ये सुधारणा फॉर्म भरावा लागेल.
- यानंतर, तुम्हाला फॉर्ममध्ये अपडेट करायचा असलेला मोबाईल नंबर भरा आणि फॉर्म सबमिट करा.
- पडताळणीसाठी तुम्हाला बायोमेट्रिक्स करावे लागतील.
- यानंतर एक्झिकेटिव्ह तुम्हाला एक पावती देईल, ज्यामध्ये एक विनंती क्रमांक (URN) लिहिला जाईल.
- तुम्ही एक रिक्वेस्ट नंबर (URN) वापरून आधारमधील अपडेटची स्थिती तपासू शकता.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या