मुंबई : हस्तरेखा शास्त्र (Palmistry) विविध रेषा, आकृती, तिळ (Mole) आणि खुणा (Mark) याच्यामाध्यमातून जीवनाच्या विविध पैलूंबद्दल शुभ-अशुभ माहिती देत असते. तसंच एक चिन्ह किंवा खुण असते स्टारची. हस्तरेखा शास्त्राच्या दृष्टिकोनातून तळहातावर स्टार (Star) म्हणजेच तारा असणे खूपच विशेष मानले जाते. हे खूप शुभ संकेत देतात. आज आम्ही तुम्हाला तळहातावर कोणत्या जागी स्टारचे चिन्ह (star sign) असते आणि त्याचे काय फायदे होतात (star sign on palm benefits) हे सांगणार आहोत.

तळहातावर स्टार असणे शुभ असते –

तळहातावर स्टार असणे शुभ (star sign on palm) असते. पण ते एखाद्या रेषेच्या शेवटी असेल तर त्याचा प्रभाव अनेक पटीने वाढतो. त्याप्रमाणे तळहाताच्या ज्या उंचवट्यावर स्टार असतो त्या उंचवट्याची शक्ती अनेक पटीने वाढते. अशामध्ये ती रेषा आणि उंचवट्याशी संबंधित लाभ अधिक चांगल्याप्रकारे मिळतो.

– बृहस्पतीच्या उंचवट्यावर स्टार असणे हे एखाद्या व्यक्तीसाठी सामर्थ्यवान आणि प्रतिष्ठित करते. त्या व्यक्तीला खूप मान-सन्मान मिळतो.

– सूर्य उंचवट्यावर स्टार असेल तर ते पैसा आणि स्थान दोन्ही मिळवण्याचे प्रबळ संकेत असतात. अशा लोकांना क्वचितच मानसिक आनंद आणि शांती मिळते.

– चंद्र पर्वतावर स्टार असेल तर लोकप्रियता आणि यश मिळते. साधारणत: अशी लोकं प्रसिद्ध कलाकार होतात.

– मंगळ उंचवट्यावर स्टार असल्याने सौभाग्य प्राप्त होते. या लोकांना संधीची काही कमतरता नसते. या व्यक्ती विज्ञानाच्या क्षेत्रात अनपेक्षित यश मिळवू शकतात.

– शुक्र उंचवट्यावर स्टारची खूण असेल तर तुम्हाला प्रेम होईल आणि तुम्हाला ती व्यक्ती मिळेल.

– शनी उंचवट्यावर स्टारची खुण असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात बरेच यश मिळते. यासाठी त्या व्यक्तीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.