नवी दिल्ली : तालिबानी दहशतवाद्यांमुळे अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता स्थापन केल्यापासून याठिकाणच्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. तालिबान्यांच्या (Taliban) दहशतीमुळे याठिकाणचे नागरिक देश सोडून जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. तालिबान्यांपासून आपला जीव वाचवण्यासाठी हे नागरिक मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी भारतीय देखील मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. अफगाणिस्तानात असलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेत हवाई दलाला यश देखील आले आहे. काबुलवरुन 168 भारतीय नागरिक आज आपल्या मायदेशी परतले आहेत.Also Read - Taliban Video: तालिबानचा क्रूर चेहरा! आधी फाशी दिली, नंतर हेलिकॉप्टरला लटकवून शहरभर फिरवला मृतदेह

Also Read - Taliban TV Interview : न्यूज अँकरच्या खांद्यावर बंदुक ठेऊन दिला LIVE इंटरव्ह्यू; लोकशाहीच्या चौथ्या स्थंभावर तालिबानचे वर्चस्व

भारतीय हवाई दलाच्या सी- 17 ( Indian Air Force C-17) या विमानातून आज सकाळी काबुलवरुन 168 भारतीय नागरिक दाखल झाले. मायदेशी परतल्यानंत या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि आपल्या देशात पोहचताच त्यांनी ‘भारत माता की जय’ असा नारा दिला. गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर वायुदलाचे हे विमान उतरवण्यात आले. याठिकाणी सर्व नागरिकांना सुरक्षित उतरवण्यात आले. यामध्ये महिला, पुरुष, लहान मुलं आणि अफगाणिस्तानच्या भारतीय दुतावासात (Indian Embassy) काम करणाऱ्यांचा समावेश आहे. Also Read - Afghanistan Crisis: काबूल स्फोटाचा अमेरिकेने घेतला बदला, ड्रोन स्ट्राईकद्वारे मास्टर माईंडचा केला खात्मा!

काबुलमध्ये (Kabul) आणखी 87 भारतीय नागरिक अडकले आहेत. त्यांना आणण्यासाठी देखील भारतीय वायुदलाचे दुसरे विमान गेले आहे. वायुदलाच्या या विमानाने काबुमधून उड्डाण घेतले असून ते लवकरच भारतामध्ये पोहचणार आहे. गेल्या 24 तासांत एकूण 390 भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका करत त्यांना मायदेशी आणण्यात आले आहे. उर्वरीत नागरिकांना देखील लवकरच मायदेशी आणण्यात येणार आहे. या सर्व नागरिकांना आणण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून ( Indian Ministry of External Affairs) जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काबुलमध्ये भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि इतर मित्र देशांचे नागरिक अडकले आहेत. त्यांची देखील सुखरुप सुटका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.