By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Amarnath Yatra 2022 : तब्बल दोन वर्षांनंतर 30 जूनपासून अमरनाथ यात्रा होणार सुरु, एप्रिल महिन्यापासून ऑनलाइन नोंदणीला होणार सुरुवात!
Amarnath Yatra 2022 : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ठप्प झालेली अमरनाथ यात्रा यावर्षी सुरु होणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचा वातावरण आहे. यावर्षी 30 जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. 43 दिवस अमरनाथ यात्रा सुरु राहणार आहे.

Amarnath Yatra 2022 : अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra 2022) जाण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनामुळे (Corona Virus) गेल्या दोन वर्षांपासून ठप्प झालेली अमरनाथ यात्रा यावर्षी सुरु होणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचा वातावरण आहे. यावर्षी 30 जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. 43 दिवस अमरनाथ यात्रा सुरु राहणार असून पंरपरेनुसार रंक्षाबंधच्या (Rakshabandhan 2022) दिवशी संपणार आहे. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांच्या (Jammu-Kashmir Governer) कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमरनाथ श्राइन बोर्डासोबत यात्रेसंदर्भात बैठक घेतली. या बैठकीची माहिती देत राज्यपाल कार्यालयाने ट्वीट करत सांगितले की, ‘श्री अमरनाथ यात्रा श्राइन बोर्डासोबत बैठक पार पडली. 43 दिवस चालणारी ही पवित्र यात्रा 30 जूनपासून सर्व कोविड प्रोटोकॉलसह आणि परंपरेनुसार सुरू होईल. रक्षाबंधनाच्या दिवशी यात्रा संपणार आहे.’
अमरनाथ यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंची ऑनलाइन नोंदणी (Amarnath Yatra Online Booking) एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने नुकतीच या संदर्भात घोषणा केली. श्राइन बोर्डाने सांगितले की ‘दक्षिण काश्मीरमधील हिमालयीन प्रदेशातील तीर्थक्षेत्रातील यात्रेकरूंच्या हालचालीसाठी RFID आधारित ट्रॅकिंग केले जाईल.’ अमरनाथजी श्राइन बोर्डाने अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल या दोन्ही मार्गांवरून एकाच वेळी ही पवित्र यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेलिकॉप्टरने प्रवास करणाऱ्यांना सोडता दैनंदिन मार्गानुसार यात्रेकरूंची संख्या 10,000 पर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. बोर्डाने प्रवाशांसाठी 2.75 किमी लांबीच्या बालटाल ते डोमेलपर्यंत मोफत बॅटरी कार सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय अमरनाथ श्राइन बोर्डाने घेतला आहे. प्रवासासाठी निवास क्षमता, आरोग्य सुविधा, दूरसंचार सुविधा, हेली सेवा, SASB अॅप, पोनीवालांसाठी वर्षभराचा विमा यासह प्रवासी आणि सेवा प्रदात्यांच्या फायद्यासाठी यावर्षी अनेक अनोखे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. दरम्यान, अमरनाथ यात्रा करण्यास परवानगी दिली असली तरी सुद्धा कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन भाविकांना करावे लागणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर अमरनाथ यात्रेला जायला मिळणार असल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या