By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Andhra Pradesh Bus Accident: आंध्रप्रदेशमध्ये बसला भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू तर 45 जखमी
Andhra Pradesh Bus Accident: आंध्रप्रदेशमध्ये बसला भीषण ( Andhra Pradesh Bus Accident) अपघात झाल्याची घटना समो

Andhra Pradesh Bus Accident: आंध्रप्रदेशमध्ये बसला भीषण ( Andhra Pradesh Bus Accident) अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. आंध्रप्रदेशच्या चित्तूर येथे शनिवारी रात्री उशिरा बसला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 7 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 45 जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
Also Read:
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात (Chittoor District ) शनिवारी रात्री बसला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 45 प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Andhra Pradesh Police) घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने त्यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले. तिरुपती पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तिरुपतीपासून 25 किलोमीटर अंतरावर बकरापेट येथे ही घटना घडली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस उंच कड्यावरून दरीत खाली कोसळली. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.’
Andhra Pradesh | 7 people killed and 45 injured in a bus accident last night in Chittoor
Accident happened as the bus fell off the cliff due to driver’s negligence in Bakrapeta, 25 kms away from Tirupati. Aggrieved were shifted to a nearby hospital: SP, Tirupati pic.twitter.com/Vi3DFj36Uy
— ANI (@ANI) March 27, 2022
बस ज्या दरीत पडली ती 50 फुटांपेक्षा जास्त खोल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अंधारात बचावकार्य करणे कठीण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळपर्यंत बचावकार्य सुरूच होते. स्थानिक वृत्तानुसार, अपघातग्रस्त बस एका खाजगी ऑपरेटरद्वारे चालवली जात होती. अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरम येथून चित्तूरच्या दिशेने ही बस जात होती. या बसमध्ये लग्नाचे वऱ्हाड होते असे सांगितले जात आहे.