Top Recommended Stories

तरुणींसाठी Good News! iPhone 13 दिसणार 'या' रंगात, नव्या फोटोनं सगळ्यांना दिला धक्का

मुंबई: Apple iPhone 13 सीरीजबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. वेगवेगळे

Updated: August 24, 2021 8:16 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Apple iPhone 13 Series Launch
Apple has announced festive offer for buyers of the iPhone in India.

मुंबई: Apple iPhone 13 सीरीजबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. वेगवेगळे रिपोर्ट्स देखील समोर आले आहेत. Appleची न्यू सीरीज लवकरच लॉन्च होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, Apple येत्या सप्टेंबरमध्ये iPhone 13 सीरीजवरून पडदा बाजुला करणार आहे. या सीरीजमध्ये iPhone 13 मिनी, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max या चार मॉडलचा समावेश असेल. आता iPhone 13 चा फोटो समोर आला आहे. फोटोनं सगळ्यांना दिला धक्का दिला आहे. फोन नव्या रंगात दिसला आहे.

Also Read:

रोझ गोल्ड रंगात लॉन्च होऊ शकतो iPhone 13

iPhone 13 रोझ गोल्ड रंगात देखील लॉन्च होऊ शकतो. Apple विशेष म्हणजे तरुणींसाठी आणि कमी वयातील मुलांसाठी रोझ गोल्डमध्ये लॉन्च करू शकते. दरम्यान, रोझ गोल्ड कलरमध्ये इतर स्मार्टफोन देखील लॉन्च होत आहे. Apple ने देखील आधी या कलरमध्ये iPhone सीरिज लॉन्च केली होती. परंतु गेल्या काही वर्षात Apple नं नवा प्रयोग केला नव्हता. कंपनीनं गोल्ड कलर लॉन्च केला होता. परंतु रोझ गोल्ड iPhone 13 सोबतच येऊ शकतो.

You may like to read

iPhone 13 मध्ये महत्त्वपूर्ण बदल…

या शिवाय, iPhone 13 प्रो सीरीजमध्ये छुपे ईअरपीस असतील. फेस आयडी आणण्यासाठी Apple असं करणार आहे. Apple 2017 मध्ये iPhone X च्या लॉन्चिंगनंतर पहिल्यांदा स्क्रीन डिझाइनमध्ये बदल करणार आहे. हे डिव्हाइस ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि LiDAR सेंसरसोबत येईल. कॅमेरा मॉड्यूलचा आकार आणि जाडी वाढवण्यात येईल.

विजेची बचत करेन iPhone 13

न्यू iPhone 13 सीरीजमध्ये आता नॉच डिझाइनचा वापर करण्यात येईल. याशिवाय फुल-स्क्रीन डिझाइन बाजारात आणणार आहे. ते सॅमसंगच्या LTPO OLED पॅनलसोबत येईल. 120Hz एडेप्टिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करेन. आणि स्क्रीन रिफ्रेश रेट फंक्शनला एक इंटेलिजेंट एडजस्टमेंट आणेल. ऑटोमॅटिक रिफ्रेश रेट स्विच 1 – 120Hz सोबत असेल. त्यामुळे विजेची बचत होईल.

कॅमेऱ्यात देखील महत्त्वपूर्ण बदल…

न्यू सीरीजमध्ये A15 बायोनिक प्रोसेसरचा वापर करण्यात येईल. वाय-फाय 6E तंत्रज्ञानानं हा फोन अद्ययावत असेल. त्याचबरोबर कॅमेऱ्यात देखील महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे. 5पी (एफ/2.4) च्या माध्यमातून न्यू अल्ट्रा-वाइड-अँगल लेंसचा यात उपयोग करण्यात येईल. फिक्स्ड फोकसला (एफएफ) 6 पीमध्ये (एफ/1.8) अपग्रेड करेल. हे डिव्हाइस ऑटो फोकसला (AF) देखील सपोर्ट करेल.

सर्वात महाग असू शकतो iPhone 13 Pro Max

रिपोर्ट्सनुसार, ये डिवाइस सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार आहे. स्क्रीन, कॅमेरा आणि इतर फीचर्समध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे. iPhone 13 Pro Max हा Apple च्या इतिहासातील सर्वात महाग फोन असू शकतो.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: August 24, 2021 1:42 PM IST

Updated Date: August 24, 2021 8:16 PM IST