Assembly Elections 2022 Dates: पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर; 10 फेब्रुवारीपासून मतदान, 10 मार्चला मतमोजणी, रॅलींवर बंदी

निवडणूक आयोग पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पाच राज्यात 10 फेब्रुवारीपासून मतदानाच्या 7 टप्प्यांना सुरुवात होणार आहे तर 10 मार्चला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

Updated: January 8, 2022 5:17 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Assembly Elections 2022 Dates: पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर; 10 फेब्रुवारीपासून मतदान, 10 मार्चला मतमोजणी, रॅलींवर बंदी
Assembly Elections 2022 Dates Assembly elections announced in five states including UP, Code of Conduct enforced, ban on rallies

Assembly Elections 2022 Dates: : निवडणूक आयोग पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Assembly Elections 2022 Dates In Marathi) जाहीर केल्या आहे. निवडणूक आयोग उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड, मणिपूर, गोवा या राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पाच राज्यात 10 फेब्रुवारीपासून मतदानाच्या 7 टप्प्यांना सुरुवात होणार आहे तर 10 मार्चला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. या घोषणेसह या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. रॅली, रोड शो काढण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. कोणत्याही प्रकारची पदयात्रा काढण्यास परवानगी नाही. सायकल किंवा बाईक रॅली देखील काढण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. ही बंदी 15 जानेवारीपर्यंत लागू करण्यात आली आहे.

Also Read:

निवडणूक आयोगाने सर्व राज्यांमध्ये 7 टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे जाहीर केले आहे. यूपीमध्ये पहिला टप्पा 10 फेब्रुवारी, दुसरा टप्पा 14 फेब्रुवारी, तिसरा टप्पा 20 फेब्रुवारी, चौथा टप्पा 23 फेब्रुवारी, पाचवा टप्पा 27 फेब्रुवारी, सहावा टप्पा 3 मार्च, सातवा टप्पा 7 मार्च रोजी. उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत निवडणुका होणार आहेत. तर पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीपासून, मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान होईल. पंजाब आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

पंजाब आणि गोव्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी आहे. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 27 फेब्रुवारी रोजी होणार असून यासाठी उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख 8 फेब्रुवारी आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 मार्च रोजी होणार असून यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले की उत्तर प्रदेशातील 403, पंजाबमध्ये 117, उत्तराखंडमधील 70, मणिपूरमध्ये 60 आणि गोव्यातील 40 विधानसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित निवडणुका करणे हे आमचे ध्येय आहे.  तसेच, या पाच राज्यांमध्ये 18 कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील, त्यापैकी 8.5 कोटी महिला मतदार आहेत, अशी माहिती देखील सुशील चंद्रा यांनी दिली.

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत 18 कोटींहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. एकूण दोन लाख पंधरा हजार 368 मतदान केंद्रे असतील. निवडणुका कोरोनाच्या नियमानुसार होतील. यावेळी उमेदवारांना ऑनलाइन मतदान करता येणार आहे.

कोरोना बाधित 80 वर्षांवरील व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींसाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा असेल. निवडणुका कोरोनाच्या नियमानुसार होतील. मतदान केंद्रांमध्ये 16 टक्के वाढ झाली आहे. Know Your Candidate अॅप देखील तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये उमेदवारांची सर्व माहिती असेल.

यूपीमध्ये 90 टक्के लोकांना एक डोस मिळाला आहे. निवडणूक घेणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. मतदान केंद्र पूर्णपणे सॅनिटाइज केले जातील. मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली. म्हणजेच एक तास अधिक वेळ मतदान सुरू राहणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 8, 2022 4:17 PM IST

Updated Date: January 8, 2022 5:17 PM IST