Top Recommended Stories

ATM Pin: एटीएम पिन किती अंकी असावा हे कसं ठरलं माहिती आहे का?, याबद्दल घ्या जाणून!

ATM Pin: एटीएममधून पैसे काढण्यासाठी आपल्याला चार अंकी नंबर म्हणजेच पासवर्ड टाकावा लागतो. त्याशिवाय पैसे काढता येत नाही.

Updated: February 21, 2022 8:08 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

ATM Pin
ATM Pin

ATM Pin : पैशांची (Money) गरज असल्यास पूर्वी आपल्याला बँकेमध्ये (Bank) जावे लागायचे. बँकेमध्ये लांबच लांब रांगा लावाव्या लागायच्या त्यानंतर आपल्याला पैसे मिळायचे. त्यामुळे सर्वांनाच बराच त्रास व्हायचा. पण एटीएम कार्ड (ATM Card) आल्यापासून आपला हा सर्व त्रास संपला आणि पैशांचा व्यवहार करणे अधिकच सोपे झाले. सध्या एटीएम कार्डमुळे पैशांचे व्यवहार करणे अधिकच सोपे झाले आहे. त्यामुळे आपल्याला बँकेत जाण्यासाठी लागणारा बराचसा वेळ वाचला आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी आपल्याला चार अंकी नंबर म्हणजेच पासवर्ड (ATM Password) टाकावा लागतो. त्याशिवाय पैसे काढता येत नाही. आज आपण एटीएम पिनशी (ATM Pin) संबंधित महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत…

Also Read:

एटीएम मशीनचा शोध असा लागला –

बँकिंगच्या (Banking) इतिहासातील सर्वात यशस्वी शोध म्हणजे एटीएम मशीन. हे मशीन जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरॉन (John Shepherd-Barron) या स्कॉटिश शास्त्रज्ञाने शोधले होते. महत्वाचे म्हणजे या शास्त्रज्ञाचा जन्म भारतातच शिलाँग शहरात झाला होता. त्यांनीच 1969 साली एटीएम शोधून काढले. त्यानंतर हेच एटीएम मशीन जगभर लोकप्रिय झाले. याच एटीएममुळे आपल्याला पैशांचा व्यवहार करणे अधिक सोपे झाले आहे.

You may like to read

म्हणून एटीएमचा पिन 4 अंकी असतो –

जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरॉन यांनी एटीएम मशीन तयार करून त्यात कोडिंग सिस्टिम बसवली तेव्हा पिन क्रमांक हा फक्त चार अंकी का ठेवला? असावा असा प्रश्न आमच्यासह तुम्हाला देखील पडला असेल. तुमच्या मनात असलेल्या या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊया. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सुरुवातीला एटीएम पिन 4 अंकांचा असावा असा शेफर्ड यांचा कोणताही प्लान नव्हता. उलट त्यांना तो 6 अंकी ठेवायचा होता. पण जेव्हा त्यांनी त्यांची पत्नी कॅरोलिनवर हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सतत ती 6 अंकांपैकी 2 अंक विसरायची. तिला फक्त 4 अंक आठवत होते. त्याच वेळी शेफर्ड यांनी अंदाज लावला की, मानवी मेंदू सहजपणे 6 ऐवजी 4 अंक लक्षात ठेवू शकतो आणि त्यांनी एटीएम पिन चार अंकी ठेवला.

काही देशांमध्ये वापरला जातो 6 अंकी पिन –

शेफर्ड यांनी जरी एटीएमचा पिन 4 अंकी ठेवला असला तरी तो 6 अंकी ठेवण्यामागचा त्यांचा उद्देश होता तो अधिक सुरक्षित करणे. 4 अंकी एटीएम पिन 0000 ते 9999 या दरम्यानचा असतो. याचाच अर्थ कोणत्याही एटीएमचा पिन हा 10000 भिन्न पिन नंबरपैकी एकच ठेवता येतो. ज्यामध्ये 20 टक्के पिन हॅक केले जाऊ शकतात. पण 4 अंकी पिन सहज हॅक केला जाऊ शकत नसला तरी तो 6 अंकी पिनपेक्षा कमी सुरक्षित आहे. तसेच, काही देशांमध्ये आजही 6 अंकी एटीएम पिन वापरला जातो.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 21, 2022 8:07 PM IST

Updated Date: February 21, 2022 8:08 PM IST