अयोध्येतून दु:खद बातमी आली समोर, शरयू नदीत एकाच कुटुंबातील 12 जण बुडाले

श्रीराम जन्मभूमी अयोध्येतून अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे.

Updated: July 9, 2021 9:26 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

अयोध्येतून दु:खद बातमी आली समोर, शरयू नदीत एकाच कुटुंबातील 12 जण बुडाले

अयोध्या: श्रीराम जन्मभूमी अयोध्येतून (Ayodhya) अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. शरयू नदीवरील गुप्तार घाटवर (Sharayu River Guptar Ghat) स्नान करण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील 12 जण बुडाले. बुडालेल्या नागरिकांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. तिघांना वाचवण्यात यश आलं असून इतर बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. नदीत बुडालेले लोक आग्रा (Agra) येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. संपूर्ण कुटुंब अयोध्येत पर्यटनासाठी आलं होतं.

Also Read:

तिघांना वाचवण्यात यश, 12 बेपत्ता

मिळालेली माहिती अशी की, आग्रा येथील एका कुटुंबातील 15 सदस्य अयोध्या (Ayodhya) येथे पर्यटनासाठी आले होते. गुप्तार घाटवर (Guptar Ghat) सर्व स्नान करताना शरयू नदीत (Sharyu River) अचानक बुडाले. बेपत्ता नागरिकांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांना तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं उर्वरित 12 जण वाहून गेले. पोलिसांनी बचाव आणि मदतकार्य सुरू केलं आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं एकाच कुटुंबातील 12 लोक बुडाले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले निर्देश…

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अयोध्येतील गुप्तार घाटावर एकाच कुटुंबातील 12 जण बुडाल्याच्या घटनेबद्दल तिव्र दु:ख व्यक्त केलं आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून सर्च ऑपरेशन सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. गुप्तार घाटवर पोलिस पोहोचले आहेत. गरज भासल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाला (NDRF) देखील पाचारण करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: July 9, 2021 8:46 PM IST

Updated Date: July 9, 2021 9:26 PM IST