By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
BANK HOLIDAY APRIL 2022: एप्रिलमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण List
BANK HOLIDAYS IN APRIL 2022: मार्च महिना संपायला केवळ काही दिवस बाकी आहेत. त्यानंतर एप्रिल महिना सुरू होणार आहे. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये बँकांशी निगडीत तुमचे काही महत्त्वाचे कामे असतील त्यांबाबात नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

BANK HOLIDAYS IN APRIL 2022: मार्च महिना संपायला केवळ काही दिवस बाकी आहेत. त्यानंतर एप्रिल महिना सुरू होणार आहे. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला देखील सुरुवात (APRIL 2022) होणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये बँकांशी निगडीत तुमचे काही महत्त्वाचे कामे असतील त्यांबाबात नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी एप्रिलमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद (BANK HOLIDAY APRIL 2022) असतील हे माहिती असावे. गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि बैसाखी या प्रमुख सणांसह एप्रिलमध्ये एकूण 15 दिवस बँका बंद (BANK HOLIDAYS) राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिल 2022 च्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. आरबीआयच्या (RBI) या यादीनुसार एप्रिलमध्ये साप्ताहिक सुट्टीसह एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत.
Also Read:
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार बँकिंग सुट्ट्या देशभरात एकाच वेळी सर्व ठिकाणी सुट्ट्या असणार नाहीत. अनेक सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगानुसार आणि सणांच्या अधिसूचनेवर अवलंबून असतात. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू नसतील.
पाहा एप्रिलमधील सुट्ट्यांची यादी
- 1 एप्रिल – बँक खाती वार्षिक बंद – जवळपास सर्व राज्यांमध्ये बँका बंद
- 2 एप्रिल – गुढी पाडवा / उगादी महोत्सव / नवरात्रीचा पहिला दिवस / तेलुगु नववर्ष / साजिबू नोंगमपांबा (चेरोबा) – बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
- 3 एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
- 4 एप्रिल – सारिहुल-रांची येथील बँक बंद
- 5 एप्रिल – बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन – हैदराबादमध्ये बँका बंद
- 9 एप्रिल – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
- 10 एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
- 14 एप्रिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/ महावीर जयंती/ बैसाखी/ तामिळ नववर्ष/ चिरोबा, बिजू महोत्सव/ बोहर बिहू – शिलाँग आणि शिमला आणि इतर ठिकाणी बँका बंद
- 15 एप्रिल – गुड फ्रायडे/बंगाली नववर्ष/हिमाचल डे/विशू/बोहाग बिहू – जयपूर, जम्मू आणि श्रीनगर व्यतिरिक्त इतर ठिकाणी बँका बंद
- 16 एप्रिल – बोहाग बिहू – गुवाहाटीमध्ये बँक बंद
- 17 एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
- 21 एप्रिल – गदिया पूजा – आगरतळामध्ये बँका बंद
- 23 एप्रिल – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
- 24 एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
- 29 एप्रिल – शब-ए-कदर/जुमत-उल-विदा – जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद