Bank Holiday February 2022 : बँकांशी संबंधित कामं लवकर करा पूर्ण, पुढचे 11 दिवस बँक राहणार बंद!
Bank Holiday February 2022 : फेब्रुवारी महिन्याच्या उरलेल्या दिवसांत सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका 11 दिवस बंद राहणार आहेत.

Bank Holiday February 2022 : फेब्रुवारी (February 2022) महिन्यात बँकेशी संबंधित काही काम (Bank Work) असेल तर ती लवकरात लवकर करुन घ्या. कारण फेब्रुवारी महिन्याच्या उरलेल्या दिवसांत सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका (Public and private sector banks) 11 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये दोन दिवस बँकांच्या संपामुळे बँकांचे कामकाज बंद राहणार (Bank Holiday) आहे आणि उर्वरित दिवसांत शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. बँकांना सुट्ट्या असल्यामुळे ग्राहकांची कामं रखडणार आहेत. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर बँकांची कामं पूर्ण करुन घ्यावीत. नाही तर त्यांना ही कामं पूर्ण करण्यात अडचणी येतील. त्यामुळे पुढच्या दिवसांची सुट्ट्यांची यादी (Bank Holiday List) पाहा जेणे करुन तुम्हाला पुढचे नियोजन करणे सोपे जाईल.
Also Read:
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांची यादी पाहिली तर 15 फेब्रुवारीपासून सुट्ट्या सुरू होतील. गुरु रविदास जयंती, छत्रपती शिवाजी जयंती आणि मोहम्मद हजरत अली यांच्या वाढदिवसानिमित्त बँकांना सुट्टी आहे. तर 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे बँकेच्या शाखेत कामकाज बंद राहणार आहे. तर दुसरीकडे रविवार आणि शनिवार असल्याने बँका पाच दिवस बंद राहणार आहेत. बँका बंद राहणार असल्यामुळे ज्या ग्राहकांना बँकेत जाऊन काम करायचे आहे त्यांना अडचणी येतील. पण ऑनलाइन बँकिंग सेवा सुरु असणार आहे. त्यामुळे ऑनलाइन बँकिंगचा वापर करणाऱ्या ग्राहकांना काहीच समस्या येणार नाही.
महत्वाचे म्हणजे 23 आणि 24 फेब्रुवारीला बँक कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. सरकारच्या कामगारविरोधी आणि जनविरोधी धोरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाचा इशारा दिला आहे. सेंट्रल ट्रेड युनियन (CTU) आणि इतर संघटनांनी 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी बँक संपाची हाक दिली आहे. या संपात देशभरातील सर्व बँकांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज युनियनच्या (All India Bank Employees Union) केंद्रीय समितीनेही या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बँकांच्या सुट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांतील सणांवरही अवलंबून असतात.
बँकांची सुट्टी खालीलप्रमाणे –
12 फेब्रुवारी – दुसरा शनिवार
13 फेब्रुवारी रविवार
15 फेब्रुवारी – मुहम्मद हजरत अली जन्मदिवस
16 फेब्रुवारी – गुरु रविदास जयंती
18 फेब्रुवारी – डोलजत्रा
19 फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
20 – फेब्रुवारी रविवार
23 फेब्रुवारी – सर्वत्र बँक संप
24 फेब्रुवारी – सर्वत्र बँक संप
26 फेब्रुवारी – चौथा शनिवार
27 – फेब्रुवारी रविवार
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या