Bank Holidays In February 2022: फेब्रुवारीमध्ये 12 दिवस बँका राहणार बंद, येथे पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी!
Bank Holidays In February 2022: फेब्रुवारी महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी तु्म्ही बँकेच्या सुट्ट्यांची यादी जरुर बघायला हवी. नाही तर तुमचा वेळ वाया जाईल.

Bank Holidays In February 2022: काही दिवसांमध्येच फेब्रुवारी (February 2022) महिन्याला सुरुवात होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला बँकेशी संबंधित काही कामं करायची असतील तर तुम्हाला बँका कोणत्या दिवशी बंद (Bank Holiday) असणार आहेत हे जाणून घेणे खूपच गरजेचे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फेब्रुवारी 2022 मधील बँकेच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in February 2022) जाहीर केली आहे. आरबीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. या यादीनुसार फेब्रुवारी 2022 मध्ये बॅंका एकूण 12 दिवस बंद राहणार आहेत.
Also Read:
फेब्रुवारी महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी तु्म्ही बँकेच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays List) जरुर बघायला हवी. नाही तर तुमचा वेळ वाया जाईल. फेब्रुवारी 2022 मध्ये बँकांना एकूण 12 दिवस बँकांना सुट्ट्या (Bank Holidays in January) असणार आहेत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, फेब्रुवारी 2022 मध्ये वसंत पंचमी, गुरु रविदास जयंती आणि डोलजात्रा यासह 6 सुट्ट्या असतील. या निमित्ताने विविध राज्यांमध्ये बँका बंद राहतील. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी या साप्ताहिक सुट्ट्या असतील. पुढील महिन्यात 12 दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. या कालावधीत ग्राहक एटीएम, इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग आणि इतर सेवा वापरू शकतात.
बँकांच्या सुट्ट्यांची यादी पाहा (Bank Holidays List in February 2022) –
2 फेब्रुवारी 2022 : सोनम लोचर (गंगटोकमध्ये बँका बंद)
5 फेब्रुवारी 2022 : सरस्वती पूजा/श्री पंचमी/वसंत पंचमी (आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँका बंद)
15 फेब्रुवारी2022: मोहम्मद हजरत अली जन्मदिवस/लुई-नागई-नी (इंफाळ, कानपूर, लखनऊमध्ये बँका बंद)
16 फेब्रुवारी 2022: गुरु रविदास जयंती (चंदीगडमध्ये बँका बंद)
18 फेब्रुवारी 2022: डोलजात्रा (कोलकात्यात बँका बंद)
19 फेब्रुवारी2022: छत्रपती शिवाजी महाराज जयंती (बेलापूर, मुंबई, नागपूर येथे बँका बंद)
वीकेंडला बँका राहतील बंद – (February Weekend Holiday)
6 फेब्रुवारी 2022: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
12 फेब्रुवारी 2022: महिन्याचा दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
13 फेब्रुवारी 2022: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
20 फेब्रुवारी 2022: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
26 फेब्रुवारी 2022: महिन्याचा चौथा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
27 फेब्रुवारी 2022: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या