Bank Holidays In May 2022 : मे महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची पूर्ण यादी!
Bank Holidays In May 2022 : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मे 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. कोणत्या दिवशी बँका बंद (Bank Holidays In May 2022) असणार आहे हे जर तुम्हाला माहिती असले तर तुमची बँकेची कामं देखील व्यवस्थित पूर्ण होतील आणि तुमचा वेळ वाचेल.

Bank Holidays In May 2022 : एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस राहिले आहे. मे महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. मे महिन्यामध्ये बँकेशी (Bank) संबंधित काही कामं असतील तर तुम्ही आतापासूनच नियोजन करायला सुरुवात करा. कारण मे महिन्यामध्ये 13 दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने मे 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. कोणत्या दिवशी बँका बंद (Bank Holidays In May 2022) असणार आहे हे जर तुम्हाला माहिती असले तर तुमची बँकेची कामं देखील व्यवस्थित पूर्ण होतील आणि तुमचा वेळ वाचेल.
Also Read:
महिन्याच्या सुरुवातीला चार दिवस बँका राहणार बंद –
आरबीआयच्या कॅलेंडरनुसार, मे महिन्यापासून सलग चार दिवस बँकेला सुट्टी असेल. या सुट्ट्या राज्य आणि स्थानिक सणांनुसार बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआयकडून चार आधारावर जारी केली जाते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांवर आधारित आहे.
राज्यांनुसार काही सुट्ट्या –
राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, राज्यांनुसार बँकांना काही सुट्ट्या देखील आहेत. अहवालानुसार, मे महिन्यात विविध झोनमधील एकूण 31 दिवसांपैकी 13 दिवस बँका बंद राहणार आहेत.
ग्राहकांकडून विनंती –
बँकांच्या वतीने ग्राहकांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी मे महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी सर्व सुट्ट्यांची काळजी घ्यावी. तुमच्या शहरात किंवा राज्यात कोणत्या महत्त्वाच्या दिवशी शाखा बंद राहतील याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी.
मे महिन्यात या दिवशी बँका राहणार बंद –
1 मे 2022 – कामगार दिन / महाराष्ट्र दिन. (देशभरातील बँका बंद. रविवारीही या दिवशी सुट्टी असेल.)
2 मे 2022 – महर्षी परशुराम जयंती – अनेक राज्यांमध्ये सुट्टी
3मे 2022 – ईद-उल-फित्र, बसव जयंती (कर्नाटक)
4 मे 2022 – ईद-उल-फित्र, (तेलंगणा)
8 मे 2022 – रविवार
9 मे 2022 – गुरु रवींद्रनाथ जयंती – पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा
14 मे 2022 – दुसऱ्या शनिवारी बँकांना सुट्टी
15 मे 2022 – रविवार
16 मे 2022 – बुध्द पौर्णिमा
22 मे 2022 – रविवार
24 मे 2022 – काझी नजरुल इस्माल यांचा जन्मदिवस – सिक्कीम
28 मे 2022 – चौथ्या शनिवारी बँकांना सुटी
29 मे 2022 – रविवार
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या