Top Recommended Stories

BOI Recruitment 2022: बँक ऑफ इंडियामध्ये 696 पदांवर बंपर भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

Bank of India Recruitment 2022: बँक ऑफ इंडियाने 696 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यात अधिकारी पदांसह अनेक पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे आहे.

Published: April 26, 2022 7:11 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

BOI Recruitment 2022: बँक ऑफ इंडियामध्ये 696 पदांवर बंपर भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

Bank of India Recruitment 2022: बँकेत नोकरी (Bank JOBS) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. बँक ऑफ इंडियाने (Bank of India) 696 जागांवर भरती जाहीर केली आहे. या संदर्भातील अधिसूचना (BOI Recruitment 2022) देखील जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांसाठी उमेदवारांची निवड (Bank of India Jobs 2022) केली जाणार आहे. यात अधिकारी पदांसह अनेक पदांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 26 एप्रिलपासून बँक ऑफ इंडियाच्या bankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला (Official website) भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात घ्या की या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे आहे.

बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नियमित आणि कंत्राटी पद्धतीने उमेदवारांची भरती केली जाईल. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअतंर्गत प्रत्येक पदासाठी पात्रता वेगळी आहे. पदांनुसार उमेदवार अधिसूचनेत पात्रता तपासू शकतात. या भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी उमेदवार थेट या https://bankofindia.co.in/pdf/CORRECTED_FINAL.pdf लिंकवर क्लिक करू शकतात.

You may like to read

Bank of India Recruitment 2022: उपलब्ध नियमित रिक्तपदे आणि संख्या

अर्थतज्ज्ञ : 02 पदे
सांख्यिकीशास्त्रज्ञ : 02 पदे
रिस्क मॅनेजर : 02 पदे
क्रेडिट अॅनालिस्ट : 53 पदे
क्रेडिट ऑफिसर : 484 पदे
टेक अपराझल : 09 पदे
आयटी ऑफिसर-डेटा सेंटर : 42 पदे
एकूण 594 पदे

Bank of India Recruitment 2022: उपलब्ध कंत्राटी पदे आणि संख्या

मॅनेजर आयटी: 21 पदे
सीनियर मॅनेजर आयटी: 23 पदे
मॅनेजर आयटी (डेटा सेंटर): 06 पदे
सीनियर मॅनेजर आयटी (डेटा सेंटर): 06 पदे
सीनियर मॅनेजर (नेटवर्क सिक्युरिटी): 05 पदे
सीनियर मॅनेजर (नेटवर्क रूटिंग आणि स्विचिंग स्पेशलिस्ट): 10 पदे
मॅनेजर (एंड पॉइंट सिक्युरिटी): 3 पदे
मॅनेजर (डेटा सेंटर) – सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर सोलारिस/युनिक्स: 06 पदे
मॅनेजर (डेटा सेंटर) – सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर विंडोज: 03 पदे
मॅनेजर (डेटा सेंटर) – क्लाउड व्हर्च्युअलायझेशन: 03 पदे
मॅनेजर (डेटा सेंटर) – स्टोरेज आणि बॅकअप टेक्नॉलॉजिस : 03 पदे
मॅनेजर (नेटवर्क व्हर्चुअलाझेशन ऑन एसडीएन-सिडको एसीआय): 04 पदे
मॅनेजर (डेटाबेस एक्सपर्ट): 05 पदे
मॅनेजर (टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट): 02 पदे
मॅनेजर (अॅप्लिकेशन आर्किटेक्ट): 02 पदे
एकूण 102 पदे

Bank of India Recruitment 2022 : निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी, जीडी आणि वैयक्तिक मुलाखतींच्या आधारे केली जाईल. अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कोलकाता, लखनौ, मुंबई, पणजी, पटना, रायपूर, रांची, शिमला आणि तिरुवनंतपुरम येथे ही परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.