Top Recommended Stories

Bank Holidays: बँकांशी संबंधित कामं लवकर करा पूर्ण, या आठवड्यात 4 दिवस बँका राहणार बंद!

28 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टपर्यंत बँका बंद राहणार आहेत.

Published: August 25, 2021 11:42 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Bank Work
Bank Work

मुंबई : येत्या काही दिवसांमध्ये बँकाशी (Bank) संबंधित तुमची काही महत्वाची कामं असतील तर ती लवकर पूर्ण करुन घ्या. नाही तर ही कामं पूर्ण करायला तुम्हाला खूप वेळ वाट पाहावी लागेल. कारण येत्या आठवड्यात 4 दिवस बँका बंद राहणार (Bank Holidays) आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) ऑगस्ट 2021 महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची (Bank Holidays) यादी जाहीर केली होती. या यादीनुसार या महिन्यात एकूण 15 दिवस बँकांना सुट्ट्या आहे.

Also Read:

ऑगस्ट महिन्यातील (August Month) बँकांच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत. आता या महिन्याचा शेवटचा आठवडा राहिला आहे. या आठवड्यात चार दिवस बँकांना सुट्टी (Bank Holiday) असणार आहे. 28 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टपर्यंत बँका बंद राहणार आहेत. बँकांच्या या सुट्टी दरम्यान ऑनलाईन बँकिंग सेवा (Online Banking Service) आणि एटीएम सेवा (ATM Service) सुरु राहणार आहेत. पण ज्यांना बँकेच्या शाखेत (Bank Branch) जाऊन महत्वाचे काम करायचे असेल तर ते करता येणार नाही. त्यामुळे जर तुमचे खूपच महत्वाचे काम असेल तर लवकर बँकेत जाऊन ते पूर्ण करुन घ्या नाहीतर तुम्हाला चार दिवस वाट पाहावी लागेल.

You may like to read

आरबीआय नेहमी स्थानिक सणांमुळे (Festival) वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या झोनसाठी बँकेच्या सुट्ट्यांची यादी जारी करते. आरबीायने या आठवड्यामध्ये बँकांना चार दिवस सुट्टी ठेवली आहे. पण ही सुट्टी प्रत्येक राज्यातील बँकांसाठी नाही. या आठवड्यात बँका कोण-कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत…

या दिवशी बँका राहणार बंद –

28 ऑगस्ट 2021 – चौथा शनिवार

29 ऑगस्ट 2021 – रविवार

30 ऑगस्ट2021 – जन्माष्टमी / कृष्ण जयंती (अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, देहरादून, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोक)

31 ऑगस्ट 2021 – श्री कृष्ण जन्माष्टमी (हैदराबाद)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: August 25, 2021 11:42 AM IST