Whatsapp Adminने वेळीच व्हा सावध, ग्रुपवर या चूका केल्यास जावे लागेल तुरुंगात!
Whatsapp Admin Be Careful : व्हॉट्सअॅप ग्रुपवर केलेली कोणतीही चूक अॅडमिनला अडचणीमध्ये आणू शकते त्यामुळे जे कोणी व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन आहेत त्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

Whatsapp Admin Be Careful : इन्स्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (Whatsapp) हे एकमेकांशी कनेक्ट राहण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. याद्वारे तुम्ही मेसेजिंग ( Messaging) आणि व्हिडीओ कॉलद्वारे (Whatsapp video calls)तुमच्या प्रियजनांशी नेहमी संपर्कात राहू शकता. पण व्हॉट्स अॅप ग्रुप (Whatsapp Group) वापरताना काही चुका झाल्यामुळे तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे वेळीच सावध झालेले बरे. व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षा आणि गोपनीयतेबद्दल (security and privacy) खूप सतर्क आहे. यासोबतच कंपनी फेक न्यूजविरोधात अनेक कठोर पावले उचलत आहे. अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅप ग्रुप (Whatsapp Group) वापरतानाही काळजी घेणे आवश्यक आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवर केलेली कोणतीही चूक अॅडमिनला खूपच महागात पडू शकते.
Also Read:
व्हॉट्सअॅप ग्रुपवर केलेली कोणतीही चूक अॅडमिनला अडचणीमध्ये आणू शकते त्यामुळे जे कोणी व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन (Whatsapp Admin) आहेत त्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. या चूका नेमक्या कोणत्या आहेत ज्यामुळे तुम्हाला तुरुंगात जाण्याची देखील वेळ येऊ शकते त्या घ्या जाणून…
अश्लील कंटेट शेअर करू नका (Do not share pornographic content)-
व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील व्हिडिओ पाठवल्यास तुरुंगात जावे लागू शकते. असे व्हिडिओ पाठवल्यानंतर जर कोणी तुमच्या ग्रुपची तक्रार केली तर तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट देखील बॅन केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत चुकूनही कोणाला अश्लील व्हिडिओ पाठवू नका.
हिंसा भडकावणारे मॅसेज पाठवू नका (Do not send messages inciting violence)-
व्हॉट्सअॅप ग्रुपवर कोणत्याही धर्माचा अपमान करणारे व्हिडिओ किंवा फोटो शेअर करणे आणि हिंसा भडकावणे देखील तुम्हाला अडचणीत आणू शकते. कोणत्याही धर्माची किंवा प्रार्थनास्थळाची हानी करण्यासाठी द्वेषयुक्त संदेश पसरवणे देखील चुकीचे आहे आणि यासाठी तुम्हाला अटक केली जाऊ शकते.
खोट्या बातम्या टाकू नका (fake news) –
एखाद्या व्यक्तीने व्हॉट्सअॅप फेक न्यूज किंवा कंटेंट शेअर केल्यास त्याला तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते. कारण सरकार फेक कंटेंटबाबत खूपच कठोर आहे आणि फेक न्यूजच्या तक्रारीवर, फेक न्यूज शेअर करणाऱ्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनला अटक केली जाऊ शकते.
ग्रुपमध्ये देशविरोधी मजकूर शेअर करू नका (Do not share anti-national content in the group) –
व्हॉट्सअॅप ग्रुपवर कोणताही देशविरोधी मजकूर शेअर करू नका. असे केल्याने कंटेंट शेअर करणाऱ्यासह ग्रुप अॅडमिनलाही अटक केली जाऊ शकते. तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.
वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू नका (Do not share personal photos or videos)-
तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ त्याच्या परवानगीशिवाय व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करू नका. असे करणे गुन्हा आहे. जर तुम्ही असे केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या