Beating Retreat 2022: बीटिंग रिट्रीटला आहे अनेक शतकांची परंपरा, जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास
Beating Retreat 2022: 'बीटिंग द रिट्रीट सेरेमनी' हे लष्कराच्या बॅरेकमध्ये परतण्याचे प्रतीक आहे. जेव्हा युद्धाच्या वेळी सूर्यास्तानंतर सैन्य त्यांच्या छावणीत शस्त्रे घेऊन जात असे तेव्हा तेथे एक संगीत सोहळा होत होता, त्याला बीटिंग रिट्रीट म्हणतात.

Beating Retreat 2022: ‘बीटिंग द रिट्रीट’ची (Beating Retreat) परंपरा शतकानुशतके जुनी आहे. 17 व्या शतकात इंग्लंडमध्ये याची सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. जेम्स II ने (James II of England) जेव्हा लढाई संपल्यानंतर संध्याकाळी आपल्या सैनिकांना ड्रम वाजवण्याचे, ध्वज उंचावण्याचे आणि परेड करण्याचे आदेश दिले. त्यावेळी या फंक्शनला वॉच सेटिंग असे म्हटले जात होते. तेव्हापासून या बीटिंग रिट्रीटची (Beating Retreat History) परंपरा ब्रिटन, कॅनडा, अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये सुरू झाली. 1950 मध्ये भारतात प्रथमच बीटिंग रिट्रीट सेरेमनी (Beating Retreat Ceremony) आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर दोन कार्यक्रम झाले. पहिला कार्यक्रम दिल्लीतील रीगल मैदानासमोर आणि दुसरा लाल किल्ल्यावर झाला.
बीटिंग रिट्रीट दर्शवते प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाची समाप्ती
बीटिंग रिट्रीट (Beating Retreat 2022) हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाची समाप्ती दर्शवते. या कार्यक्रमात लष्कर, वायुसेना आणि नौदलाचे बँड पारंपारिक धून घेऊन संचलन करतात. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानंतर 29 जानेवारीला संध्याकाळी ‘बीटिंग द रिट्रीट’ (Beating The Retreat) कार्यक्रम आयोजित केला जातो. दिल्लीतील रायसीना रोडवरील राष्ट्रपती भवनासमोर ते प्रदर्शित करण्यात येते. प्रजासत्ताक दिनाप्रमाणे हा कार्यक्रमही पाहण्यासारखा आहे. यासाठी राष्ट्रपती भवन, विजय चौक, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक अतिशय सुंदर रोषणाईने सजवण्यात येतात.
बीटिंग रिट्रीट म्हणजे काय?
‘बीटिंग द रिट्रीट सेरेमनी’ हे लष्कराच्या बॅरेकमध्ये परतण्याचे प्रतीक (Beating Retreat significance) आहे. जेव्हा युद्धाच्या वेळी सूर्यास्तानंतर सैन्य त्यांच्या छावणीत शस्त्रे घेऊन जात असे तेव्हा तेथे एक संगीत सोहळा होत होता, त्याला बीटिंग रिट्रीट म्हणतात.
1950 च्या दशकात भारतात बीटिंग रिट्रीट्स सुरू झाले. त्यानंतर भारतीय लष्कराचे मेजर रॉबर्ट यांनी सैन्याच्या बँडच्या प्रदर्शनासह हा सोहळा पूर्ण केला. राष्ट्रपती या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात. विजय चौकात राष्ट्रपतींचे आगमन होताच त्यांना राष्ट्रीय मानवंदना देण्यात येते आणि यावेळी जन गण मन हे राष्ट्रगीत होते. यासोबतच राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला जातो आणि आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही या तिन्ही दलांचे बँड पारंपारिक सुरात मार्च करतात.
बँड वाजवल्यानंतर रिट्रीटचे बिगुल वादन होते. यादरम्यान बँडमास्टर राष्ट्रपतींकडे जातो आणि बँड परत घेण्याची परवानगी मागतो. याचा अर्थ असा की 26 जानेवारीचा उत्सव संपला आहे आणि बँड मार्च परतताना “सारे जहाँ से अच्छा” ही लोकप्रिय धून वाजवतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या