Beer Price Hike: बिअरप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! किमतीत मोठी वाढ होणार
Beer price hike| बिअर बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या barleyची किंमत तीन महिन्यांत दुपटीने वाढल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. यासोबतच बाटली निर्मात्यांनीही किमतीत 30 टक्क्यांनी वाढ केली आहे.

Beer Price Hike: महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. आता या महागाईचा बिअरप्रेमींनाही झटका बसणार आहे. बिअरच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने आता बिअरच्या दरात देखील वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत अनेक बिअर उत्पादक कंपन्यांनी दिले आहेत. उन्हाळ्यात बिअरची मोठी मागणी असते. अशातच बिअर उत्पादक कंपन्यांनी किमती वाढवण्याची तयारी केली आहे.
Also Read:
एका इंग्रजी न्यूज वेबसाईटनुसार, देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. ट्रान्सस्फोर्टच्या खर्चात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यात बिअरच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या बार्लीच्य (barley) दरात तीन महिन्यांत दुप्पट वाढ झाली आहे. यासोबतच बॉटलिंग कंपन्यांनी देखील दरात 30 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर लेबलपासून ते बॉक्सपर्यंतच्या किमतीही वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत बिअरच्या किमती वाढवण्यासाठी अनेक कंपन्यांनी तयारी केली आहे.
दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक शहरांमध्ये बिअरचे दर वाढवण्यात येणार आहे. परंतु ग्राहकांवर जास्त बोजा पडणार नाही, याची देखील काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती युनायटेड ब्रुअरीजचे सीईओ ऋषी परदल यांनी दिली आहे. यूबी कंपनी हेनेकेन आणि किंगफिशर ब्रँड अंतर्गत बिअर बनवते. यापूर्वी कंपनीने बीरा 91 ब्रँडच्या किमती वाढवल्या आहेत.
दुसरीकडे, दिवान्स मॉडर्न ब्रुअरीजचे एमडी प्रेम दिवाण यांनी देखील दरवाढीचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, वाढत्या खर्चामुळे कंपनीवर अतिरिक्त बोजा वाढला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कंपन्यांसमोर दोन पर्याय आहेत. ते म्हणजे, बिअरच्या दरात वाढ करावी अन्यथा त्यावरील सवलत रद्द करावी. दरम्यान, दिवान्स कंपनी गॉडफादर, सिक्स फील्ड्स, कोट्सबर्ग या लोकप्रिय ब्रँडच्या बिअरची निर्मिती करतो.