
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Income Tax Return Benefits: 2021-22 साठी इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. तुम्हाला 31 जुलैपर्यंत आयटीआर भरावा लागेल. बर्याच लोकांना वाटते की जर त्यांचे वार्षिक उत्पन्न ( Income )2.5 लाखांपेक्षा कमी असेल आणि ते कराच्या कक्षेत येत नाही. यामुळे त्यांना आयटीआर भरण्याची (Income Tax File) गरज नसते. तुम्ही आयकराच्या कक्षेत येत नसले तरीही तुम्ही रिटर्न भरले पाहिजे, कारण तुम्ही ITR फाइल केल्यास त्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. ITR दाखल केल्याने कर्ज मिळणे सोपे होते. याशिवाय व्हिसासाठीही ते आवश्यक आहे. आज आपण ITR भरण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
ITR हा तुमच्या उत्पन्नाचा पुरावा आहे. हे सर्व बँका आणि NBFC द्वारे उत्पन्नाचा पुरावा म्हणून स्वीकारले जाते. तुम्ही बँकेच्या कर्जासाठी अर्ज केल्यास, अनेक वेळा बँका ITR मागतात. जर तुम्ही नियमितपणे ITR फाइल करत असाल तर तुम्हाला बँकेकडून सहज कर्ज मिळू शकते. या व्यतिरिक्त, तुम्ही कोणत्याही फाइनेंशियल इंस्टीट्यूशनकडून कर्जाव्यतिरिक्त इतर सेवा सहजपणे घेऊ शकता.
तुम्ही दुसऱ्या देशात जात असाल, तर तुम्ही व्हिसासाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्नसाठी विचारले जाऊ शकते. अनेक देशांचे व्हिसा अधिकारी व्हिसासाठी 3 ते 5 वर्षांचा आयटीआर मागतात. ITR द्वारे ते तपासतात की ज्या व्यक्तीला त्यांच्या देशात यायचे आहे त्याची आर्थिक स्थिती कशी आहे.
जर तुमच्या उत्पन्नातून टॅक्स कटून सरकारकडे जमा करण्यात आला आहे. तर तुमचे उत्पन्न आयकराच्या मूळ सूट मर्यादेत असले तरीही, तुम्ही आयटीआर भरल्याशिवाय तो परत मिळवू शकत नाही. जर तुम्हाला टॅक्स रिफंडचा क्लेम करायचा असेल तर त्यासाठी ITR फाइल करणे आवश्यक आहे. तुम्ही ITR फाइल करता तेव्हा आयकर विभाग त्याचे असेस्मेंट करते. तुमचा रिफंड केला गेला तर तो थेट बँक खात्यात क्रेडिट केला जातो.
ITR पावती तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवली जाते, जी पत्त्याचा पुरावा म्हणून काम करू शकते. याशिवाय, ते तुमच्यासाठी उत्पन्नाचा पुरावा म्हणूनही काम करते.
जर तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल आणि तुम्हाला तोटा झाला असेल, तर तोटा कॅरी फॉरवर्डसाठी ठरलेल्या वेळेच्या मर्यादेत इनकम टॅक्स रिटर्न फाइल करणे गरजेचे आहे. कारण पुढच्या वर्षी तुम्हाला कॅपिटल गेन होते, त्यामुळे नुकसान या फायद्यामुळे अॅडजस्ट होते आणि तुम्हाला लाभावर टॅक्स सूटचा फायदा मिळू शकतो.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या