BHEL Recruitment 2022: BHELमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 71 हजारांपर्यंत मिळेल पगार

12 जानेवारीपर्यंत उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.

Published: January 7, 2022 4:15 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

BHEL Recruitment 2022

BHEL Recruitment 2022 : नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत हेवी इलेक्ट्रीकल लिमिटेडने (Bharat Heavy Electrical Limited) सिव्हिल डिसिप्लिनमध्ये इंजिनिअर आणि सुपरवायझर (Engineers and Supervisors) या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. कंपनीने यासंर्भात अधिकृत अधिसूचना (BHEL Recruitment 2022) जारी केली आहे. 36 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचे आहेत ते pswr.bhel.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. 12 जानेवारीपर्यंत उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.

Also Read:

12 जानेवारी 2022 पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जाची प्रत आणि इतर आवश्यक कागदपत्रे जमा करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2022 निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 30 डिसेंबर 2021पासून सुरू झाली आहे. सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट pswr.bhel.com किंवा careers.bhel.in वर निर्धारित वेळेत अर्ज करू शकतात. उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल.

पदांचा तपशील –

इंजिनिअर – 10 पदं
सुपरवायझर – 26 पदं

पगार –

सुपरवायझर पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 39,970 रुपये पगार मिळेल. ज्यांची इंजिनिअर पदासाठी नियुक्त केली जाईल त्यांना दरमहा 71,040 रुपये पगार मिळेल.

पात्रता –

इंजिनिअर – उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किमान 60 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असणे आवश्यक आहे.

सुपरवायझर – सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा असलेले उमेदवारही पर्यवेक्षक पदांसाठी अर्ज करू शकतात.

वयाची अट –

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नसावेत.

निवड प्रक्रिया –

इंजिनिअर आणि सुपरवायझर पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 7, 2022 4:15 PM IST