Top Recommended Stories

Tamilnadu Accident: मोठी दुर्घटना! मंदिराच्या रथयात्रेदरम्यान विजेचा धक्का बसून 2 मुलांसह 11 जणांचा मृत्यू

Tamilnadu Accident: तामिळनाडुमधील तंझावूरमध्ये बुधवारी (27 एप्रिल) सकाळी मोठी दुर्घटना होऊन एका धार्मिक उत्सवाला गालबोट लागले. रथयात्रेदरम्यान हायटेंशन विद्युत वाहिनीचा धक्का बसून 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

Updated: April 27, 2022 9:08 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Tamilnadu Accident: मोठी दुर्घटना! मंदिराच्या रथयात्रेदरम्यान विजेचा धक्का बसून 2 मुलांसह 11 जणांचा मृत्यू

Tamilnadu Accident: रथयात्रेदरम्यान हायटेंशन विद्युत वाहिनीचा धक्का बसून 11 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून त्यांना तंजोर मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तामिळनाडूतील तंझावर शहरात बुधवारी (27 एप्रिल) सकाळी ही घटना घडली.

Also Read:

मिळालेल्या माहितीनुसार, तंझावरच्या एका मंदिरात बुधवार सकाळी 94 वा अप्पर गुरुपूजा उत्सव साजरा करण्यात आला. मंगळवारी रात्रीपासूनच मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. पुजेनंतर बुधवारी सकाळी रथयात्रा काढण्यात आली. रथ ओढण्यासाठी शेकडो भाविक पुढे आले होते. या दरम्यान रथाला हायटेंशन विद्युत वाहिनीचा धक्का बसून 11 भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक जण किरकोळ जखमी झाले. मृतांमध्ये 2 मुलांचा समावेश आहे. जखमी नागरिकांना तंजोर मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

You may like to read


रथयात्रा सुरु झाली तेव्हा रस्त्यावर पाणी साचले होते. एका वळणावर रथ विद्युत वाहिनीच्या संपर्कात आला. विजेचा धक्का बसताच 50 हून अधिक भाविकांनी रथ ओढणे थांबवले. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली आणि मोठी दुर्घटना टळली. रथयात्रेदरम्यान विजेचा धक्का बसून 11 जणांचा मृत्यू झाल्याने तंझावूर शहरावर मोठी शोककळा पसरली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 27, 2022 8:52 AM IST

Updated Date: April 27, 2022 9:08 AM IST