7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी! 23.29 टक्के पगारवाढीसह सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे

कर्मचाऱ्यांना 1 जुलै, 2018 पासून लाभ मिळणार आहे. तर आर्थिक लाभ 1 एप्रिल, 2020 पासून मिळेल. विशेष म्हणजे जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 10,247 कोटी रुपये अतिरिक्त भार पडणार आहे.

Updated: January 12, 2022 5:52 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

7th Pay Commission Latest News
7th Pay Commission: The move from the Chhattisgarh government will benefit around 3.80 lakh state government employees.

7th Pay Commission: आंध्र प्रदेश सरकारने (Andhra Pradesh Government Employees) आपल्या कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीचे (Makar Sankranti 2022) मोठे गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना 23.29 टक्के पगारवाढसह (Salary Increment) सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे (Retirement age) करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी (Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy) यांच्या नेतृत्त्वात झालेल्या कर्मचारी संघटनेच्या (Government Job)बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Also Read:

मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांची कर्मचारी संघटनेच्या शिष्ट मंडळासोबत बैठक पार पडली. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या निर्णयाची घोषणा केली. आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह वाढीव सेवानिवृत्ती वयाचा लाभ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना 23.29 टक्के पगारवाढ देण्यात आली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, कर्मचाऱ्यांना 1 जुलै, 2018 पासून लाभ मिळणार आहे. तर आर्थिक लाभ 1 एप्रिल, 2020 पासून मिळेल. विशेष म्हणजे जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 10,247 कोटी रुपये अतिरिक्त भार पडणार आहे.

थकीत डीए देखील मिळणार…

मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी बैठकीनंतर सांगितले की कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता (DA) देखील देण्यात येणार आहेय. यासोबतच भविष्य निधी, विमा आणि इतर लाभ देखील एप्रिल 2022 पर्यंत दिले जातील. याचा अर्थ असा की कर्मचारी पुन्हा दिवाळी साजरी करणार आहेत.

पेंशन योजनेवर होणार लवकरच निर्णय…

अंशदायी पेंशन योजनेवर लवकरच निर्णय होणार असल्याचे संकेत देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कॅबिनेटची एक उपसमिती यासंदर्भात विचाराधीन आहे. 30 जूनपर्यत अंतिम निर्णय घेण्यात येईल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या संबंधित समस्या देखील सोडवल्या जाणार आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 12, 2022 5:52 PM IST

Updated Date: January 12, 2022 5:52 PM IST