नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकरानं शुक्रवारी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर उपचारासाठी (Covid-19 Treatment) मिळणाऱ्या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही. त्याचबरोबर कोरोनामुळे निधन झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या शासकीय मदतीवर देखील कोणताही कर आकारण्यात येणार नाही. यासोबतच पॅनकार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhar Card) लिंक (Pan-Aadhaar linking) करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी अंतिम मुदत ही 30 जूनपर्यंत होती.Also Read - MPSC Exam Age Limit : मोठी बातमी! MPSC परीक्षेसाठी कमाल संधीची मर्यादा रद्द, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचे स्वागत

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी शुक्रवारी ही घोषणा केली आहे. अर्थ राज्यमंत्री म्हणाले, पॅन आणि आधार लिंक करण्यासाठीच्या मुदतीत 3 महिन्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही मुदतवाढ 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. त्याशिवाय थेट कर देयकेची मुदत दोन महिन्यांनी वाढवून 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. सध्या, त्याची अंतिम मुदत 30 जून होती. याशिवाय करदात्यांसाठीही अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या कामांची मुदत 15 दिवसांवरून 2 महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. Also Read - 5G Telecom services: लवकरच 5G सेवा होणार सुरु, केंद्र सरकारने स्पेक्ट्रम लिलावाला दिली मंजुरी!

Also Read - Post Office Yojana: पोस्टाच्या या योजनेत गुतवणूक करून मिळवा दुप्पट परतावा; जाणून घ्या काय आहे योजना?

टीडीएस अर्ज (Tds Statements) सादर करण्याच्या मुदतीत 15 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. सध्याची अंतिम मुदत 30 जून होती जी 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. कर कपात प्रमाणपत्रांची (Tax deduction certificates) मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.