मुंबई: Reliance Jio यूजर्स अर्थात ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. ही बातमी यूजर्सना नाराज करणारी आहे. आज गणेश चतुर्थीला कंपनी सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन JioPhone Next विक्रीसाठी उपलब्ध करून देणार होती. मात्र, कंपनीनं JioPhone Next चा सेल तुर्तास पुढे ढकलला आहे. अशातच Reliance Jio नं कोणतीही घोषणा न करता मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे Jio ने आपले दोन स्वस्त प्रीपेड प्लान अचानक बंद केले आहेत. 39 रुपये आणि 69 रुपये किमतीचे हे दोन प्लान होते. कंपनीकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.Also Read - Xiaomi 11 Lite 5G NE: लॉन्च झाला स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

JioPhone चे हे दोन्ही प्रीपेड प्लान होते. Jio च्या वेबसाइटवर दोन्ही प्लान लिस्टेड नाही. या आधी देखील Jio नं आपल्या ग्राहकांना झटका दिला होता. कंपनीनं Buy 1 Get 1 Free ऑफर देखील गुंडाळली आहे. Also Read - JioBook Laptop: 4G स्मार्टफोननंतर आता Jio लॉन्च करणार स्वस्त लॅपटॉप!

JioPhone चा 39 रुपयांचा स्वस्त प्लान

JioPhone साठी 39 रुपयांचा हा सर्वात स्वस्त प्लान आहे. यात ग्राहकांना 14 दिवसांची व्हॅलिडिटीसोबत डेली 100MB डेटा मिळत होता. या शिवाय यूजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देखील फ्री होती. याशिवाय डेली 100 एसएमएसची सुविधा मिळते. इतकंच नाही तर यूजर्सला Jio ऐप्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं. मात्र, आता यूजर्सला या प्लानचा लाभ घेता येणार नाही. कारण , Jio च्या वेबसाइटवर दोन्ही प्लान लिस्टेड नाही. Also Read - Realme च्या लेटेस्ट 5G स्मार्टफोनवर मिळतोय 6,000 रुपयांचा डिस्काउंट, तुम्हीही घेऊ शकतात लाभ

JioPhone का 69 रुपये वाला प्लान

JioPhone साठी 69 रुपयांचा हा सर्वात स्वस्त प्लान आहे. यात ग्राहकांना 14 दिवसांची व्हॅलिडिटीसोबत डेली 0.5GB डेटा मिळतो. या शिवाय यूजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देखील फ्री होती. याशिवाय डेली 100 एसएमएसची सुविधा मिळते. इतकंच नाही तर यूजर्सला Jio ऐप्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं. 39 रुपये आणि 69 रुपयांच्या दोन्ही प्लान्समध्ये केवळ डेटाचा फरक आहे.