Top Recommended Stories

Nitish Kumar Attacked: बिहारच्या मुख्यमंत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न, तरुणाला घेतले ताब्यात

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री बख्तियारपूर (Bakhtiyarpur) येथे गंगा नदीच्या काठावर स्वातंत्र सेनानी शीलभद्र याजी (Shilbhadra Yaji) यांच्या पुतळ्याला पुष्पांजलि अर्पण करण्यासाठी पोहोचले असता ही घटना घडली. एका तरुणाने मुख्यमंत्र्यांचे कवच भेदून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

Published: March 27, 2022 9:34 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Nitish Kumar Attacked: बिहारच्या मुख्यमंत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न, तरुणाला घेतले ताब्यात
Bihar CM Nitish Kumar said the state was "fully prepared" to handle the third COVID wave. (Photo: ANI)

Bihar CM Nitish Kumar Attacked: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री बख्तियारपूर (Bakhtiyarpur) येथे गंगा नदीच्या काठावर स्वातंत्र सेनानी शीलभद्र याजी (Shilbhadra Yaji) यांच्या पुतळ्याला पुष्पांजलि अर्पण करण्यासाठी पोहोचले असता ही घटना घडली. एका तरुणाने मुख्यमंत्र्यांचे कवच भेदून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आरोपी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तरुणाने मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न का केला, यामागील कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेली माहिती अशी, की मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा ताफा बख्तियारपूर येथील गंगा नदीच्या काठावर पोहोचला होता. पंडित शीलभद्र याजी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यासाठी जात होते. तितक्यात एक तरुण आला आणि त्याने मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर बुक्की मारण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तरुणाला ताब्यात घेतले. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

You may like to read

तरुणाने का केला हल्ल्याचा प्रयत्न?

पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याचा कसून चौकशी सुरू आहे. आरोपी तरुण मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याचे समजते. परंतु अद्याप या प्रकरणी कोणीही बोलण्यास तयार नाही. प्रकरण हायप्रोफाइल असल्याने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.