Top Recommended Stories

Blocked YouTube Channels : फेक न्यूज पसरवणाऱ्या यूट्यूब चॅनेल्सला सरकारचा दणका, पाकिस्तानी 6 अकाउंटसह 16 चॅनेल्स केले बंद!

Blocked YouTube Channels : ब्लॉक करण्यात आलेली 16 यू ट्यूब चॅनल्स (YouTube) ही भारतासंदर्भात फेक न्यूज (Fake News) पसरवत होते. यातील 6 अकाउंट्स हे पाकिस्तानमधील (Pakistani Channel )  तर 10 चॅनेल्स भारताशी निगडित आहेत. या चॅनल्सची दर्शक संख्या 68 कोटींपेक्षा अधिक आहे. 

Published: April 26, 2022 11:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Blocked YouTube Channels : फेक न्यूज पसरवणाऱ्या यूट्यूब चॅनेल्सला सरकारचा दणका, पाकिस्तानी 6 अकाउंटसह 16 चॅनेल्स केले बंद!

Blocked YouTube Channels : देशाची राष्ट्रीय सुरक्षा ( National Security), परराष्ट्र सुरक्षा ( Foreign Security)  तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेसंदर्भात फेक बातम्या पसरवणाऱ्यांवर केंद्र सरकारची ( Central Government ) करडी नजर आहे. त्यानुसार फेक न्यूज पसरवणाऱ्या 16 यूट्यूब चॅनेल्सवर (YouTube Channels )  सरकारने कारवाई केली आहे. हे चॅनेल्स ब्लॉक (Blocked YouTube Channels ) करण्यात आले आहेत. ब्लॉक करण्यात आलेल्या चॅनेलमध्ये 6 पाकिस्तानी चॅनेल्सचा (Pakistani Channel ) देखील समावेश आहे.

Also Read:

या कारवाईबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ( Ministry Of Information And Broadcasting ) सांगितले की, ब्लॉक करण्यात आलेली 16 यू ट्यूब चॅनल्स (YouTube) ही भारतासंदर्भात (India ) फेक न्यूज (Fake News )  पसरवत होते. यातील 6 अकाउंट्स हे पाकिस्तानमधील ( Pakistan) तर 10 चॅनेल्स भारताशी निगडित आहेत. या चॅनल्सची दर्शक संख्या 68 कोटींपेक्षा अधिक आहे. या चॅनल्सकडून देशाची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र सुरक्षा तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेसंदर्भात फेक बातम्या पसरविणात येत होत्या. या आधी फेसबुक (Facebook ), इंस्टाग्राम (Instagram)  सारख्या सोशल मीडियासह ( Social Media ) 60 यू ट्यूब चॅनल्सवर देखील माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे कारवाई करण्यात आली आहे.

You may like to read

जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

सरकाराने सांगितले की, काही यू ट्यूब चॅनेल्सवरून दहशत निर्माण केली जात आहे. देशातील सामाजिक सुव्यवस्था बिघडविण्यासाठी एका समुदायाला आतंकवादी म्हणून दाखविले जात आहे. तर इतर धर्मांना भडकविले जात आहे. अशा चॅनेल्सवर लक्ष ठेवून असल्याचे सरकारने सांगितले.

पाकिस्तानी चॅनेल्सकडून फेक न्यूज

ब्लॉक करण्यात आलेल्या 6 पाकिस्तानि चॅनेल्सवरून भारतीय सेना, जम्मू आणि काश्मीर, युक्रेन युद्धाशी निगडित भारतासंदर्भात फेक न्यूज पसरविल्या जात होत्या. मात्र या सर्व गोष्टी भारताने फेटाळल्या असून या यू ट्यूब चॅनेल्सवरील बातम्या फेक असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 23 एप्रिल रोजी खासगी वृत्तवाहिन्यांना खोटे दावे आणि निंदनीय मथळे वापरू नये असा सल्ला दिला होता. मंत्रालयाने केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा 1995 च्या कलाम 20 च्या तरतुदींनुसार नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले  होते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या