नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) देशातील सर्व राज्यातील उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांना (State Board) बारावीच्या निकालाबाबत (12th Board Result 2021) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पुढील 10 दिवसांच्या आत रद्द करण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांच्या निकालाचा मूल्यांकन फॉर्म्युला सादर करण्याचे आदेश देखील सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.Also Read - Gujarat Riots: गुजरात दंगलप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा दिलास, सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

सुप्रीम कोर्टानं देशातील सर्व राज्य उच्च माध्यमिक मंडळांना (State Board) 31 जुलैपर्यत (12th Board Result 2021) घोषित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि दिनेश माहेश्वरी यांच्या न्यायपीठानं हे आदेश दिले आहेत. न्यायपीठानं दिलेल्या निर्देशानुसार, देशातील सर्व शिक्षण मंडळांना पुढील 10 दिवसांच्या आत परीक्षांच्या निकालाचा मूल्यांकन फॉर्म्युला सादर करावा लागणार आहे. त्याचबरोबर CBSE, ICSE सारख्या बोर्डांना देखील 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर (12th Board Result 2021) जाहीर करण्यास सांगण्यात आलं आहे. अधिवक्ता अनुभा सहाय श्रीवास्तव यांच्याद्वारा दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं हे निर्देश दिले आहेत. Also Read - Jhund Movie : अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड'ला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, OTT वर सुरु राहणार चित्रपटाची स्ट्रीमिंग

दरम्यान, देशभरात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील CBSEसह देशातील सर्व शिक्षण मंडळांनी 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. Also Read - Gyanvapi Masjid Explained: काय आहे ज्ञानवापी मशिदीचा संपूर्ण वाद, जाणून घ्या कधी काय घडलं?

CBSC चा बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला-

केंदीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSE नं 12 वीच्या परीक्षेच्या निकालाचा (CBSE 12th Board Result 2021) फॉर्म्युला ठरवला आहे. CBSE Board नं जाहीर केलेल्या 30:30:40 या फॉर्म्युल्यानुसार 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात येणार आहे.

काय आहे 30:30:40 फॉर्म्युला?

बारावीचा वीचा निकाल (CBSE 12th Board Result 2021) तयार करताना विद्यार्थ्यांचे 10 वीचे 30 टक्के गुण, 11 वीचे 30 टक्के गुण आणि 40 टक्के 12 वीच्या पूर्व परीक्षेतील गुणांचा आधार घेण्यात येणार आहे. CBSC च्या निकाल समितीकडून (CBSE Board Result 2021) हा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे.