पाटणा : बिहारच्या (Bihar) मोतिहारी जिल्ह्यामध्ये रविवारी खूपच मोठी दुर्घटना घडली आहे. सिकरहना नदीत बोट उलटून 22 जण बुडाले (22 people drown) आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शिकारगंज पोलिस ठाण्याच्या (shikarganj police Station) हद्दीत येणाऱ्या गोढिया गावात घडली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे. सहा जणांचे मृतदेह (6 dead bodies) बाहेर काढण्यात आले आहेत तर इतर जणांचा शोध सुरु आहे.Also Read - Breaking News Live Updates: राज ठाकरे यांचा पुणे दौरा अचानक रद्द, आजारी असल्यामुळे घेतला निर्णय

बोटीमधून 20 ते 25 जण प्रवास करत होते. गोढिया गावाजवळ येताच ही बोट अचानक बुडाली. बोट बुडत असल्याचे लक्षात येता स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी बचावकार्य सुरु केले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस (Bihar Police) आणि अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासनाचे बचावकार्य सुरु आहे. सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर इतर जणांचा शोध सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. Also Read - Breaking News Live Updates: Bhima Koregaon Case: माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंगांना समन्स

मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीमध्ये फक्त 12 लोकांना बसण्याची जागा होती. तरी सुद्धा या बोटीमध्ये जास्त लोकांना बसवण्यात आले होते. गरजेपेक्षा जास्त जण या बोटीतून प्रवास करत असल्यामुळे ही बोट नदीमध्ये पलटी झाली. नदीच्या पाण्याचा प्रवाह खूप वेगाने असल्याने या पाण्यासोबत लोकं वाहून गेले. आतापर्यंत 22 पैकी 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. गुरांना चारा आणण्यासाठी या बोटीतून लोकं जात होती. त्याच दरम्यान हा अपघात झाला. बोटीमध्ये जास्त प्रवासी बसल्यामुळे ही घटना घडली आहे. Also Read - Ananya Panday फक्त 12 वी पास, Aryan Khan सोबत पार्टीत अशी करायची मज्जा-मस्ती... पाहा Photo