BOB Recruitment 2022: बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती, अर्ज कसा करायचा ते घ्या जाणून!
BOB Recruitment 2022: ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते बॅक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाली आहे.

BOB Recruitment 2022 : बँकेत नोकरी (Bank Job 2022) शोधत असलेल्यां तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदाने रिस्क मॅनेजमेंट आणि फ्रॉड रिस्क डिपार्टमेंटमध्ये व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, प्रमुख / उपप्रमुख पदांसाठी (BOB Recruitment 2022) अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे एकूण 42 पदे भरली जाणार आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते बॅक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाली आहे. या पदांवरील भरती कंत्राटी आणि इतर आधारावर केली जाणार आहे.
Also Read:
BOB Recruitment 2022: असा करा अर्ज –
– अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सर्वप्रथम bankofbaroda.in या बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
– यानंतर चालू ओपनिंगच्या दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि त्यानंतर RECRUITMENT OF HUMAN RESOURCES: FRAUD RISK MANAGEMENT & RISK MANAGEMENT DEPARTMENTS या लिंकवर क्लिक करा.
– पुढील चरणात ऑनलाइन अर्ज या पर्यायावर क्लिक करा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
– यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज व्यवस्थित पूर्ण भरा.
BOB Recruitment 2022: अर्ज फी –
– सामान्य, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS) – 600 रुपये
– एससी- एसटी कॅटेगरी – 100 रुपये
– पीएच कॅटेगरी – 100 रुपये
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या