Top Recommended Stories

BOB Recruitment 2022: बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, विनापरीक्षा निवड, अत्ताच करा अर्ज

BOB recruitment 2022 : बँक ऑफ बडोदाने वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. बँकेने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार बँक या पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करेल आणि त्यासाठी परीक्षा घेणार नाही.

Published: January 25, 2022 7:19 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

BOB Recruitment 2022: बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, विनापरीक्षा निवड, अत्ताच करा अर्ज
BOB Recruitment 2022

BOB recruitment 2022 : बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. बँकेने याबाबतची अधिसूचना जारी (BOB recruitment 2022) केली आहे. अधिसूचनेनुसार बँक या पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करेल आणि त्यासाठी परीक्षा घेणार नाही. या भरती प्रक्रियेद्वारे (BOB Jobs 2022) बँक एकूण 58 रिक्त पदांवर भरती करणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2022 पासून सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 27 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in ला भेट द्यावी लागेल.

BOB Wealth Management Services Dept Vacancy: रिक्त पदांचा तपशील

वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (गुंतवणूक आणि विमा) – 28 जागा
खाजगी बँकर (रेडिएशन प्रायव्हेट) – 20 जागा
गुंतवणूक संशोधन व्यवस्थापक (पोर्टफोलिओ आणि डेटा विश्लेषण आणि संशोधन) – 2 जागा
पोर्टफोलिओ रिसर्च अॅनालिस्ट – 2 जागा
एनआरआय वेल्थ प्रॉडक्ट मॅनेजर – 1 जागा
उत्पादन व्यवस्थापक (व्यापार आणि विदेशी मुद्रा) – 1 जागा
व्यवसाय नियमन (वरिष्ठ व्यवस्थापक) – 1 जागा
उत्पादन प्रमुख (खाजगी बँकिंग) – 1 जागा
समूह विक्री प्रमुख – 1 जागा
हेड वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (गुंतवणूक आणि विमा) 1 जागा

You may like to read

भरती कंत्राटी पद्धतीने केली जाईल

उमेदवारांची निवड कराराच्या आधारे केली जाईल. करार 5 वर्षांसाठी असू शकतो. मात्र बँकेद्वारे कराराचा कालावधी वाढविला जाऊ शकतो. हे पूर्णपणे कामगिरीवर अवलंबून असते.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड त्यांच्या फॉर्म आणि गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड मुलाखत किंवा ग्रुप डिस्‍कशनच्या आधारे केली जाईल.

अर्ज शुल्‍क

जनरल आणि OBC : 600
SC/ ST/PWD: 100
महिला : 100

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.