Top Recommended Stories

BPNL Recruitment 2022: भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये मेगाभरती, 10वी पास उमेदवारांनी त्वरित करा अर्ज

BPNL Recruitment 2022: सरकारी नोकऱ्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदची बातमी आहे. भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये विविध पदांवर मेगाभरती करण्यात येणार आहे. बीपीएनएलकडून यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Published: January 31, 2022 6:00 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

BPNL Recruitment 2022: भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये मेगाभरती, 10वी पास उमेदवारांनी त्वरित करा अर्ज
BPNL Recruitment 2022

BPNL Recruitment 2022: सरकारी नोकऱ्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदची बातमी आहे. भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये (BPNL Recruitment 2022) विविध पदांवर मेगाभरती करण्यात येणार आहे. बीपीएनएलकडून यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये (Bharatiya Pashupalan Nigam Limited Recruitment 2022) 10वी पास ते पीजी पदवी धारकापर्यंत भरती करण्यात येणार आहे. भारतीय पशुपालन निगम लिमिटेडने (BPNL)एकूण 7875 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. बीपीएनएल भर्ती 2022 चे (BPNL Vacancy 2022) इतर तपशील जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज फी आणि (BPNL Jobs 2022) अर्ज कसा करावा खाली देण्यात आले आहेत.

Also Read:

BPNL Recruitment 2022 : आवश्यक पात्रता

उमेदवारांने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था, बोर्ड किंवा विद्यापिठातून 10वी. ग्रॅजुएशन किंवा पीजी पदवी पूर्ण केलेली असावी. जे उमेदवार ही पात्रता पूर्ण करतात ते या पदांसाठी अर्ज करू शकतात.

You may like to read

BPNL Recruitment 2022 : भरतीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होईल: 28 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 फेब्रुवारी 2022

BPNL Recruitment 2022 : भरतीसाठी अर्ज शुल्क

प्रशिक्षण नियंत्रक अधिकारी अर्ज शुल्क (Training Controlling Officer Application Fee) : 944
प्रशिक्षण प्रभारी अर्ज शुल्क (Training In Charge Application Fee) : 826
प्रशिक्षण समन्वयक (Training Coordinator Application Fee): 708
प्रशिक्षण सहाय्यक (Training Assistant Application Fee) : 590

BPNL Recruitment 2022 : किती असेल पगार?

प्रशिक्षण नियंत्रक अधिकारी : 21700
प्रशिक्षण प्रभारी : 18500
प्रशिक्षण समन्वयक : 15600
प्रशिक्षण सहाय्यक : 12800

BPNL Recruitment 2022 : वयोमर्यादा

उमेदवाराचे किमान वय : 28
उमेदवाराचे कमाल वय : 45

BPNL Recruitment 2022 : निवड प्रक्र‍िया

ऑनलाइन टेस्ट
मुलाखत
डॉक्‍यूमेन्ट व्हिरिफिकेशन (DV)

BPNL Recruitment 2022 : असा करा अर्ज

या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावे लागतील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना थेट या https://pay.bharatiyapashupalan.com/onlinerequirment लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करता येईल. तसेच उमेदवारांना या https://www.bharatiyapashupalan.com/Home लिंकवर क्लिक करून भरती संदर्भातील अधिक माहिती आणि अधिकृत अधिसूचना पाहता येईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 31, 2022 6:00 PM IST