Top Recommended Stories

live

Breaking News Live Updates: पाकिस्तान दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत, गुप्तचर अहवालातून धक्कादायक बाब आली समोर

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: January 20, 2022 8:02 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Breaking News Live Updates: पाकिस्तान दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत, गुप्तचर अहवालातून धक्कादायक बाब आली समोर

Live Updates

  • 7:55 PM IST
    पाकिस्तान दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारी, गुप्तचर अहवालातून धक्कादायक बाब आली समोर

    – भारताविरुध्द मोठा कट रचण्याच्या तयारीत पाकिस्तान, गुप्तचर यंत्रणांचा इशारा
    – भारताशी मैत्रीची इच्छा व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा समोर
    – प्रजासत्ताक दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा मोठा कट
    – गुप्तचर अहवालातून धक्कादायक बाब आली समोर
    – दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या लॉन्चिंग कमांडरसह 7 दहशतवाद्यांचा जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न
    – पीओकेमधील दातोटेच्या निक्याल भागात अल बद्रचे 5 दहशतवादी एका गाईडसोबत दिसले
    – तारकुंडी किंवा कांगगली भागातून काश्मीरमध्ये घुसून भारतावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न
    – प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी जम्मू-काश्मीरसह देशातील सर्व पोलिस दल आणि निमलष्करी दलांना हायअलर्ट जारी
  • 5:41 PM IST
    अनिल देशमुख यांना ऑर्थर रोड जेलमध्ये आणखी 14 दिवस मुक्काम कारावा लागणार

    – आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांच्या न्यायलयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ
    – अनिल देशमुख यांना 2 नोव्हेबर 2021 रोजी अटक झाली होती
    – अनिल देशमुख जवळपास 3 महिन्यांपासून ऑर्थर रोड जेलमध्येच

    – मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केले होते 100 कोटी वसुलीचे आरोप


  • 4:18 PM IST

    गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, उत्पल पर्रीकर यांची उमेदवारी नाकारली

    – भाजपकडून गोव्यातील 40 पैकी 34 जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा
    – भाजपने माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांची पणजीतून उमेदवारी नाकारली
    – भाजप आणि उत्पल पर्रीकर यांचा मुद्दा पुन्हा गाजणार
    – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे साखळी मतदार संघातून निवडणूक लढवणार

  • 3:11 PM IST
    अभिनेता शाहीर शेखच्या वडिलांचे कोरोनामुळे निध

    शाहीर शेखरच्या वडिलांचे करोनामुळे निधन
    कोरोनामुळे शरीरात पसरले होते इन्फेक्शन
    शाहीर शेखरच्य घरावर कोसळला दु:खाचा डोंगरा
  • 3:03 PM IST
    खोटी माहिती पसरवणाऱ्या बेवसाइट्स आणि युट्यूब चॅनेल होणार बंद – अनुराग ठाकूर

    अफवा पसरवणाऱ्या वेबसाइट्स आणि युट्यूब चॅनल्स बंद करणार
    केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती
    केंद्र सरकारने 20 युट्यूब चॅनल्स आणि 2 वेबसाइट्सवर बंदी घातली होती
  • 9:50 AM IST
    ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांचे निधन

    अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने निधन
    गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाने होते त्रस्त
    सलमान खानच्या विरुद्धच्या हिट अँड रन खटल्यात शिवदे यांनी बाजू मांडली
  • 8:32 AM IST
    राज्यात ओमिक्रॉन रुग्णांमध्ये मोठी वाढ, 214 नव्या रुग्णांची भर

    राज्यात ओमिक्रॉन रुग्णांमध्ये मोठी वाढ
    24 तासांत 214 नव्या रुग्णांची भर
    राज्यातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या 2,074 वर
    सर्वाधिक 158 रुग्ण पुण्यात आढळले
  • 8:32 AM IST
    राज्यात 24 तासांत 43,697 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 49 रुग्णांचा मृत्यू

    राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरु झालीये
    राज्यात 24 तासांत 43,697 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
    24 तासांत 49 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
    तर 46,591 रुग्णांनी केली कोरोनावर मात

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 20, 2022 7:32 AM IST

Updated Date: January 20, 2022 8:02 PM IST