Top Recommended Stories

live

Breaking News Live Updates: सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच, संतप्त विद्यार्थ्यांनी यार्डात उभी असलेली पॅसेंजर ट्रेन पेटवली

Breaking News Live Updates: देश-विदेशातील ताज्या घडामोडी (Breaking news), मनोरंजन (Entertainment), क्रीडा (Sports) क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील (Maharashtra Breaking) महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: January 26, 2022 3:23 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

bihar burning train

Live Updates

  • 3:17 PM IST
    सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच, संतप्त विद्यार्थ्यांनी यार्डात उभी असलेली पॅसेंजर ट्रेन पेटवली

    – रेल्वे विभागातील आरआरबी (RRB) एनटीपीसी (NTPC) परीक्षेच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप
    – संतप्त विद्यार्थ्यांनी घेतली आक्रमक भूमिका
    – बिहारच्या बक्सर, मुझफ्फरपूर, नालंदा, नवादा, सीतामढी आणि आरानंतर आता गया रेल्वे स्टेशनवर रेले रोको आंदोलन
    – विद्यार्थ्यांनी बुधवारी गयामध्ये मोठा गोंधळ घातला
    – गया रेल्वेस्टेशन परिसरात विद्यार्थ्यांनी चालत्या ट्रेनवर दगडफेक केली
    – संतप्त विद्यार्थ्यांनी यार्डात उभी असलेली पॅसेंजर ट्रेन पेटवून दिली
    – पेटत्या ट्रेनच्या बोगीतील आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल
  • 11:04 AM IST
    येणारी आव्हाने परतवण्यासाठी आपण वज्रमुठ करूया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    – असीम त्याग, समर्पण आणि अनेकांचे हौतात्म्य यातून साकारलेले भारतीय प्रजासत्ताक बलशाली करूया.

    – येणारी आव्हाने परतवण्यासाठी आपण वज्रमुठ करूया, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या जनतेला दिल्या शुभेच्छा…


  • 11:01 AM IST
    शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय क्रांतिकारी, शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

    -शिवाजी पार्कवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण
    – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित
    – राज्य सरकारचा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय क्रांतिकारी- राज्यपाल
    – गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्र सरकारने केलेली कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण
    – नवनवीन योजना राज्यात राबविल्याचे समाधान, राज्यपालांनी काढले गौरवोद्गार
    – राज्यपाल कोश्यारी यांचे प्रजासताक दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात भाषण
  • 7:55 AM IST
    पद्म पुरस्कारांची घोषणा… जनरल बीपीन रावत, कल्याण सिंह आणि राधेशाम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण

    – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची राष्ट्रपती कार्यालयातून घोषणा
    – एकूण 128 जणांना या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
    – कला क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण जाहीर
    – जनरल बीपीन रावत, कल्याण सिंह आणि राधेशाम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर
    – पद्म पुरस्कारांमध्ये 4 पद्मविभूषण,17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कार जाहीर
    – यंदाच्या पद्म पुरस्कारांत 34 महिलांचा समावेश, परदेशी/एनआरआय अशा 10 व्यक्तीचा समावेश
    – 13 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला
  • 7:52 AM IST
    केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलिस पदकांची घोषणा, महाराष्ट्रातील 51 जणांचा सन्मान

    – पोलिस विभागासाठी गौरवाची बाब असणाऱ्या पोलिस पदकांची घोषणा
    – महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर
    – चार पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’
    – 7 पोलिस अधिकाऱ्यांना ‘पोलिस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलिस पदक’ जाहीर
    – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलिस पदक’ जाहीर करते
    – यावर्षी एकूण 939 ‘पोलिस पदक’ जाहीर झाली असून 88 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम), 189 पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’
    – 662 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलिस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर

Breaking News Live Updates: देश-विदेशातील ताज्या घडामोडी (Breaking news), मनोरंजन (Entertainment), क्रीडा (Sports) क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील (Maharashtra Breaking) महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 26, 2022 7:50 AM IST

Updated Date: January 26, 2022 3:23 PM IST