Top Recommended Stories

live

Breaking News Live Updates: भाजप आमदार नितेश राणेंचा कोठडीतील मुक्काम वाढला, सोमवारी सुनावणी

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: February 5, 2022 7:51 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Breaking News Live Updates: भाजप आमदार नितेश राणेंचा कोठडीतील मुक्काम वाढला, सोमवारी सुनावणी

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Also Read:

Live Updates

 • 7:46 PM IST
  भाजप आमदार नितेश राणेंचा कोठडीतील मुक्काम वाढला, सोमवारी सुनावणी

  – शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांची जामीन मिळवण्यासाठी कसरत
  – जामीन अर्जावर आता सोमवारी सुनावणी होणार
  – त्यामुळे आमदार नितेश राणेंचा कोठडीतील मुक्कम आणखी वाढला
  – आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली
  – सरकारी वकिलांनी प्रकरण दुसऱ्या कोर्टात वर्ग करावे, असा अर्ज केला
  – आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होवू शकली नाही
  – सरकारी पक्ष वेळ काढूपणा करतोय, असा आक्षेप नितेश राणे यांच्या वकीलांनी नोंदवला
  – मात्र, सुनावणी सोमवारीच होणार असल्याने नितेश राणे यांना पुढील काही दिवस तरी न्यायालयीन कोठडीत काढावी लागणार
 • 5:04 PM IST
  पुण्यामध्ये अजित पवार आणि उदयनराजे यांची भेट

  पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार उदयनराजे यांची भेट
  पुण्यातील विश्रामगृह येथे झाली भेट
  या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
 • 1:52 PM IST
  पुण्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पूर्णवेळ भरणार – अजित पवार

  पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पूर्णवेळ भरणार
  दोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ
  पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची माहिती
  कोरोनाच्या संकटामुळे शाळा अर्धवेळ भरवल्या जात होत्या
 • 12:08 PM IST
  जम्मू-काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश

  श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
  दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश
  श्रीनगर शहरातील झाकुरा भागात आज सकाळी झाली चकमक
  मृत दहशतवादी लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफ या दहशतवादी संघटनांचे
 • 12:06 PM IST
  जम्मू-काश्मीर आणि दिल्ली भूकंपाच्या धक्क्याने हादरली

  जम्मू-काश्मीर, दिल्लीला भूंकपाचे तीव्र धक्के
  अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे केंद्र
  भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर
  भूंकपाचे धक्के जाणवताच लोकांनी घराबाहेर घेतली धाव
 • 12:04 PM IST
  राज्यात 24 तासांत 13,840 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार
  राज्यात 24 तासांत 13,840 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
  तर 24 तासांत 81 कोरोनाबाधितांचा मृत्यू
  राज्यात गेल्या 24 तासांत 27,891 रुग्णांनी केली कोरोनावर मात
 • 12:00 PM IST
  देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, 24 तासांत 1,27,049 रुग्णांची नोंद

  देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
  24 तासांत 1,27,049 रुग्णांची नोंद
  24 तासांमध्ये 2,30,814 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  तर 24 तासांत 1059 कोरोनाबाधितांचा मृत्यू
  देशांतील कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटीदर 7.98 टक्क्यांवर
 • 9:37 AM IST
  1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला अटक

  अबू बकरला संयुक्त अरब अमिरातीतून केली अटक
  अबू बकरला 29 वर्षांनी केली अटक
  अबू बकरच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु
  लवकरच त्याला भारतामध्ये आणणार
  बॉम्बस्फोटात 257 नागरिकांचा झाला होता मृत्यू
  तर 700 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते
 • 8:25 AM IST

  पुण्यातील स्लॅब दुर्घटना प्रकरण, पुणे पोलिसांनी 4 जणांना केली अटक

  पुण्यातील स्लॅब दुर्घटना प्रकरण
  पुणे पोलिसांनी 4 जणांना केली अटक
  येरवड्यातील शास्त्रीनगर येथे घडली होती घटना
  बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा लोखंडी स्लॅब कोसळला
  या दुर्घटनेत पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल
  तर गंभीर जखमी झालेल्या पाच कामगारांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 5, 2022 8:22 AM IST

Updated Date: February 5, 2022 7:51 PM IST