Top Recommended Stories

live

Breaking News Live Updates: कर्नाटकात तणाव वाढला! तीन दिवस शाळा-महाविद्यालये राहाणार बंद

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: February 8, 2022 7:10 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Breaking News Live Updates: कर्नाटकात तणाव वाढला! तीन दिवस शाळा-महाविद्यालये राहाणार बंद
In the description of the infraction, the headscarf worn by Muslim women was misspelled as “jihab.”

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Also Read:

Live Updates

  • 7:09 PM IST
    हिमस्खलनात बेपत्ता 7 जवानांना वीरमरण, लष्कराकडून दुजोरा

    – अरुणाचल प्रदेशातून एक दुःखद बातमी समोर
    – डोंगराळ भागात हिमस्खलनात 7 जवानांना वीरमरण
    – लष्कराकडून वृत्ताला दुजोरा, बचाव पथकाला जवानांचे मृतदेह आढळले
    – हिमस्खलनाची घटना राज्यातील कामेंग सेक्टरच्या उच्च उंचीच्या भागात घडली
    – जवान रविवारी लष्कराच्या गस्तीचा याभागात कर्तव्यावर होते
    – हिमस्खलनाचा तडाखा बसला आणि सात जवान बेपत्ता झाले होते
    – आता सातही जवानांचे मृतदेह सापडले आहेत
  • 5:49 PM IST
    कर्नाटकात तणाव वाढला! तीन दिवस शाळा-महाविद्यालये राहाणार बंद

    – कर्नाटकात हिजाब घालण्यावरुन वाद चांगलाच चिघळला, कलम 144 लागू
    – विद्यार्थ्यांनी तिरंग्याऐवजी लावला भगवा ध्वज
    – कर्नाटकात हिजाब घालण्यावरुन वाद चिघळला
    – कर्नाटक पोलिसांनी कलम 144 केले लागू
    – बागलकोटमध्ये दगडफेकीनंतर आंदोलनाला हिंसक वळण
    – पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केला लाठीचार्ज
    – या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन दिवस शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला
    – याबाबत मुख्यंत्री मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्वीट केले आहे.
  • 4:17 PM IST
    कर्नाटकात हिजाब घालण्यावरुन वाद चिघळला, कलम 144 लागू

    कर्नाटकात हिजाब घालण्यावरुन वाद चिघळला
    विद्यार्थ्यांनी तिरंग्याऐवजी लावला भगवा ध्वज
    कर्नाटक पोलिसांनी कलम 144 केले लागू
    बागलकोटमध्ये दगडफेकीनंतर आंदोलनाला हिंसक वळण
    पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केला लाठीचार्ज
  • 12:54 PM IST
    परशुराम घाटात दरड कोसळली, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

    मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प
    कोकणातील परशुराम घाटात दरड कोसळली
    दरड बाजुला हटविण्याचे काम हाती घेण्यात आले
    घटनास्थळी पोलिस आणि क्रेन दाखल झाल्या आहेत
  • 9:42 AM IST
    संतोष परब हल्ला प्रकरण, नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

    सिंधुदुर्ग शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण
    नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
    सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात होणार सुनावणी
    जामीन की कोठडीतील मुक्काम वाढणार?
    नितेश राणे कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात
    छातीत दुखू लागल्यानं नितेश राणेंवर उपचार सुरू
  • 9:36 AM IST
    गोवा आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध होणार

    भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध होणार
    उ.प्रदेशात अमित शाह प्रसिद्ध करणार जाहीरनामा
    पणजीत नितीन गडकरींच्या हस्ते होणार प्रकाशन
  • 9:35 AM IST
    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपणार

    पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपणार
    11 जिल्ह्यांतील 58 जागांवर 10 फेब्रुवारीला मतदान
    उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात 2.27 कोटी मतदार
  • 9:22 AM IST
    हत्या आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी गुरमीत राम रहीम 21 दिवसांसाठी तुरुंगाबाहेर

    4 वर्षांपासून गुरमीत राम रहीम आहे तुरुंगात
    गुरमीत राम रहीम 21 दिवसांच्या फरलोवर तुरुंगातून बाहेर
    पंजाब निवडणुकीपूर्वी राम रहीम तुरुंगाबाहेर आल्यामुळे विरोधकांची टीका
    विरोधक आक्रमक झाले असून सरकारला घेरण्याच्या तयारीत
  • 7:37 AM IST
    भाजप नेते किरीट सोमय्यांना धक्काबुकी करणाऱ्या शिवसैनिकाला अटक

    किरीट सोमय्यांना धक्काबुकी करणाऱ्या सनी गवतेला अटक
    शनिवारी पुणे महानगरपालिकेत सोमय्यांना धक्काबुकी
    धक्काबुकीत सोमय्या खाली कोसळले आणि जखमी झाले
    धक्काबुकी करणाऱ्या शिवसैनिकाला अखेर पोलिसांनी अटक केली

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 8, 2022 7:32 AM IST

Updated Date: February 8, 2022 7:10 PM IST