विरोधीपक्ष Mission 2024 अर्थातच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दिल्लीत आज विरोधी पक्षांची सर्वात मोठी बैठक होत आहे. 15 पक्षांचे नेते राष्ट्रमंचाच्या झेंड्याखाली एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान बैठकीचं केंद्रबिंदू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देश-विदेशातील ताज्या घडामोडींसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया…Also Read - Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीत तीन मोठे निर्णय! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला मंजुरी

Also Read - LPG Connection : महागाईचा भडका! एलपीजी गॅस कनेक्शन घेणे महागले, आजपासून नवे दर लागू

Also Read - Maharashtra Political Crisis Live Update: "याचा अर्थ काय?" मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

Live Updates

 • 9:42 PM IST
  राज्यात आज 9 हजार 43 रूग्ण कोरोनामुक्त
  मंगळवारी दिवसभरात 8 हजार 470 नवे कोरोनाबाधित
  दिवसभरात 188 कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद
  राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.9 टक्क्यांवर पोहोचले
  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.98 टक्के एवढा
 • 8:36 PM IST
  “पवारांची नवी आघाडी हा शून्य अस्तत्व असलेल्या लोकांचा बातमीत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न”
  भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांची आज दिल्लीत झालेल्या बैठकीवर टीका
  नवी आघाडी हा हास्यास्पद प्रयोग, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही – माधव भंडारी
 • 8:08 PM IST
  शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक संपली
  अडीचतास चाललेल्या या बैठकीत 15 विरोधी पक्षांच्या नेत्यांचा होता समावेश
  “राष्ट्रमंचची बैठक भाजपा विरोधी राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी नव्हती”
  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी दिली बैठकीतील चर्चेबाबत माहिती
  “बैठक पवारांच्या घरी झाली असली तरी त्यांनी ही बैठक बोलावल्याच्या चर्चा निराधार”
  “ही बैठक राष्ट्रमंचचे प्रमुख यशवंत सिन्हा यांनी बोलावल्याची मेमन यांची माहिती
  “या बैठकीत देशातील सध्याच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक वातावरणावर चर्चा”
  “या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी राष्ट्रमंचाची काय भूमिका ठरवण्याबाबत उहापोह”
  माजित मेमन यांनी बैठकीत मोदीविरोधी आघाडीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.
 • 5:39 PM IST
  कोरोनामुळे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवस होणार
  पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी पार पडणार
  विधानभवन परिसरात प्रवेशासाठी RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची
  विधानभवनात 3 व 4 जुलै रोजी RT-PCR चाचणीसंदर्भात व्यवस्था केली जाणार
  विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनाच्या प्रांगणात संपन्न
 • 2:44 PM IST
  खासदार नवनीत कौर राणा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती
  अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
  हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं दिली स्थगिती
  हायकोर्टानं खासदार नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र केलं होतं रद्द
  हायकोर्टानं जात पडताळणी समितीकडे प्रकरण पाठवणं गरजेचे होतं- सुप्रीम कोर्ट
  जात पडताळणी करण्याचा अधिकार जात पडताळणी समितीचा आहे- सुप्रीम कोर्ट
 • 12:45 PM IST
  दुसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतरही सरकार सज्ज नव्हतं, राहुल गांधींचा आरोप
  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मोदी सरकारनं सज्ज व्हावं- राहुल गांधी
  तिसरी लाटेच्या शास्त्रज्ञांच्या इशाऱ्याकडे गांभीर्यानं पाहा – राहुल
  दुसऱ्या लाटेत केलेल्या चुका आता तरी दुरुस्त करा – राहुल
  राहुल गांधी यांनी श्वेतपत्रिकेत सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी
  पायाभूत सुविधा तयार करणे आणि ऑक्सिजन तसेच औषधी पुरवणे
  लसीकरण करणे, गरीब लोकांना आर्थिक मदत करणे.

 • 10:02 AM IST
  कोल्हापूरमध्ये मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक
  कोल्हापूरात आज मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन
  सकल मराठा समाजाकडून ताराराणी चौकात सकाळी 10 वाजता चक्काजाम आंदोलन
  पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार
  राज्य सरकारनं मागण्या मान्य न केल्यानं मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरणार
 • 8:06 AM IST
  मुंबई मंत्रालय बॉम्बनं उडवण्याची धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक
  मुंबई मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांकडून अटक
  ई-मेलद्वारे दिली होती धमकी, पुण्यात घोरपडीमधून एकाला अटक
  शैलेश शिंदे असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव
  मुलीचं शाळेत अॅडमिशन न झाल्यानं त्यानं गृहविभागाला धमकीचा मेल
  चौकशीत धक्कादायक कारण आलं
  समोर

 • 7:50 AM IST
  नवी दिल्लीत आज विरोधी पक्षांची सर्वात मोठी बैठक होणार!
  देशातील 15 पक्षांचे नेते राष्ट्रमंचाच्या झेंड्याखाली एकत्र येणार असल्याची माहिती
  कॉंग्रेस बैठकीला हजर राहणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार
  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान बैठकीचं केंद्रबिंदू असण्याची शक्यता
  समान विचारसरणीच्या पक्षांना एकत्र करण्याचे उद्दीष्ट
  शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून राजकीय घडामोडींना वेग