live

Breaking News Live Updates: दिलासादायक! राज्यात दिवसभरात 9 हजार 671 रुग्णांची कोरोनावर मात

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: January 8, 2022 10:13 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ
देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Also Read:

Live Updates

 • 10:05 PM IST

  दिलासादायक! राज्यात आज 9 हजार 671 रुग्णांची कोरोनावर मात

  गेल्या 24 तासात 41,434 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 13 जणांचा मृत्यू
  राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 73 हजार 238 वर

 • 8:57 PM IST

  महाराष्ट्रात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. हे नवीन नियम 10 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

  खाजगी कार्यालयात ५०% कर्मचाऱ्यांची उपस्थिती
  लेखी परवानगीशिवाय सरकारी कार्यालयात अभ्यागतांना परवानगी नाही.
  सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोकांना परवानगी नाही
  स्थानिक खेळ आयोजित करण्यावर बंदी
  50 % क्षमतेसह शॉपिंग मॉल
  50% क्षमतेसह रेस्टॉरंट-हॉटेल
  50 % क्षमतेसह थिएटर
  घरगुती प्रवास – दुहेरी लसीकरण झालेल्यांमध्ये किंवा 72 तासांच्या आत आरटी-पीसीआर नकारात्मक अहवाल
  सार्वजनिक वाहतुकीमध्ये दुहेरी लस घेतलेल्या लोकांनाच परवानगी आहे
  दुहेरी डोस असलेले लोक लोकल ट्रेनमध्ये जाऊ शकतात.

 • 8:54 PM IST

  महाराष्ट्रात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. हे नवीन नियम 10 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
  रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू
  लग्न समारंभात जास्तीत जास्त 50 लोक
  अंत्यसंस्कारात जास्तीत जास्त 20 लोक
  सामाजिक/धार्मिक/राजकीय कार्यक्रमात जास्तीत जास्त 50 लोक
  सार्वजनिक मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे बंद
  मनोरंजन पार्क, संग्रहालय, प्राणीसंग्रहालय बंद
  स्विमिंग पूल, स्पा, ब्युटी सलून, जिम बंद
  हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेने उघडतील – रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद
  शाळा-कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद, कोचिंग क्लासेस बंद

 • 4:20 PM IST
  मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा सुप्रीम कोर्टात, 12 जानेवारीला सुनावणी होणार

  विनोद पाटील यांनी सु्प्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल
  12 जानेवारीला याप्रकरणावर सुनावणीची शक्यता
 • 2:55 PM IST
  अभिनेत्री मिथिला पालकरला कोरोनाची लागण

  मिथिला पालकरने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
  वाढदिवसापूर्वीच मिथिलाला झाली कोरोनाची लागण
  मिथिला पालकर सध्या आयसोलेशनमध्ये आहे
  मिथिलाला कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत
 • 1:27 PM IST
  यूपी, पंजाबसह 5 राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची आज होणार घोषणा

  दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग देणार माहिती
  साडेतीन वाजता निवडणूक आयोगाची होणार पत्रकार परिषद
  कोणत्या राज्यात किती टप्प्यात मतदान होणार हे स्पष्ट होईल
 • 11:19 AM IST
  भाजप आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

  आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी
  मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल
  मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून केली तक्रार
  आशिष शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन आली धमकी
  फोनवर अर्वाच्य भाषेत केला शिविगाळ
 • 8:34 AM IST
  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना कोरोनाची लागण

  राज्यातील राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात
  राज्यातील मंत्र्यांपाठोपाठ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कोरोना पॉझिटिव्ह
  रावसाहेब दानवे यांनी ट्वीट करत दिली माहिती
 • 8:34 AM IST
  चिंताजनक! राज्यात 24 तासांत कोरोनाच्या 40,925 रुग्णांची नोंद, 20 जणांचा मृत्यू

  राज्यात 24 तासांत कोरोनाच्या 40,925 रुग्णांची नोंद
  24 तासांत कोरोनाच्या 20 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात 1,41,492 सक्रीय कोरोना रुग्ण
  तर 14,256 रुग्णांनी केली कोरोनावर मात

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 8, 2022 7:23 AM IST

Updated Date: January 8, 2022 10:13 PM IST