live

Breaking News Live Updates: कोविडची सेल्फ टेस्टिंग किट खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोअरवर द्यावा लागेल आधार कार्ड क्रमांक

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: January 15, 2022 2:57 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Breaking News Live Updates: कोविडची सेल्फ टेस्टिंग किट खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोअरवर द्यावा लागेल आधार कार्ड क्रमांक
Aadhar card number has to be given at medical store to buy covid self testing kit

देश-विदेशातील ताज्या घडामोडी (Breaking news), मनोरंजन (Entertainment), क्रीडा (Sports) क्षेत्रातील ताज्या अपडेटसह (Live Updates) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या (Maharashtra news) बातम्यांवर टाकूया एक नजर…

Also Read:

Live Updates

 • 2:54 PM IST
  Covid Self Testing Kit
  कोविडची सेल्फ टेस्टिंग किट खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोअरवर द्यावा लागेल आधार कार्ड क्रमांक
  कोणी नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार
  अत्तापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी केली सेल्फ टेस्टिंग किट, त्यापैकी 3549 पॉझिटिव्ह
  अलीकडे मोठ्या संख्येने लोकांनी किट खरेदी करून स्वत:ची चाचणी केली
  परंतु सकारात्मक अहवाल आल्यानंतरही अनेकांनी बीएमसीला दिली नाही माहिती
 • 1:03 PM IST
  मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई, काश्मीरमधून ड्रग्ज तस्कराला ठोकल्या बेड्या

  – मुंबई क्राईम ब्रँचची काश्मीरमध्ये मोठी कारवाई
  – काश्मीरमधून गुलजार मकबूल अहमद खान नावाच्या ड्रग्ज तस्कराला ठोकल्या बेड्या
  – मुंबई क्राईम ब्रँचने गेल्या काही दिवसांपूर्वी 24 किलो ड्रग्जसह 4 जणांना अटक केली होती
  – या प्रकरणाच्या तपासात गुलजार मकबूल अहमद खान याचे नाव समोर आले होते
  – त्यानंतर मुंबई पोलिस काश्मीरला गेले आणि गुलजार मकबूल अहमद खानच्या मुसक्या आवळल्या
 • 9:16 AM IST
  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 150 हून अधिक स्टार्टअपशी संवाद साधणार

  – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कृषी आणि आरोग्यासह विविध क्षेत्रातील 150 हून अधिक स्टार्टअप व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्यावसायिकांशी संवाद साधतील
  – या संवाद कार्यक्रमात कृषी आणि आरोग्याशिवाय एंटरप्राइझ सिस्टम्स, स्पेस, इंडस्ट्री 4.0, सुरक्षा, फिनटेक आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध स्टार्टअप्स व्यावसायिक सहभाग घेतील.
 • 8:38 AM IST
  महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच, गेल्या 24 तासांत 43211 नव्या रुग्णांची नोंद

  – राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख, गेल्या 24 तासांत 43211 नव्या रुग्णांची नोंद
  – 19 जणांचा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू तर 33356 रुग्ण कोरोनामुक्त
  – राज्यात सध्या कोरोनाच्या संक्रीय रुग्णांची संख्या 261658
  – ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 1605
  – नागपूरमध्ये आढळले 1732 नवीन कोरोनाचे रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू
 • 8:32 AM IST
  विधानसभा निवडणुकीत प्रचार आणि मेळाव्यावर बंदी कायम राहणार, निवडणूक आयोग आज घेणार निर्णय

  – 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत जाहीर सभा, रोड शो आणि मेळाव्यावरील बंदी वाढवण्यात येणार
  – ही बंदी यापुढेही कायम राहण्याची शक्यता, केंद्रीय निवडणूक आयोग आज घेणार निर्णय
  – निवडणुकी आधीच कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय
  – उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा राज्यात 10 फेब्रुवारीपासून विधानसभा निवडणुका
  – राजकीय पक्षांना प्रत्यक्ष स्वरूपात कुठेही उपस्थित न राहता ऑनलाइन माध्यमातून निवडणूक प्रचार करण्याचे आवाहन

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 15, 2022 8:26 AM IST

Updated Date: January 15, 2022 2:57 PM IST