राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट (Third Wave of Corona) येण्याची शक्यता आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (Delta plus Veriant) धोका लक्षात घेता राज्य सरकारने (Maharashtra Government) सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊनचे ( Maharashtra Lockdown) कठोर निर्बंध लागू केले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशामध्ये कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त भीषण नसणार असा निष्कर्ष आयसीएमआरने एका अभ्यासातून काढला आहे. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया…Also Read - New Covid Variant Detected : सावधान! देशात कोरोनाची चौथी लाट? नवा BA 2.75 व्हेरिएंट आढळला

Also Read - Maharashtra Government: 'हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा'; उद्धव ठाकरेंचे शिंदे सरकारला आव्हान!

Also Read - 'हा वाद आता पुरे, लवकरात लवकर Metro 3 सुरु करा', Sumeet Raghavan चा नव्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा!

Live Updates

 • 9:40 PM IST
  राज्यात आज नव्या रुग्णांची संख्या कालच्या पेक्षा कमी
  राज्यात आज 6 हजार 727 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
  आज 10, 812 रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 95.99 टक्के
  राज्यात आज 101 कोरोना रुग्णांचा मृत्यू, मृत्यूदर 2.01 टक्के
  राज्यात 1 लाख 17 हजार 874 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू
 • 6:15 PM IST
  महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची सर्वात महत्त्वाची बातमी

  मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट
  संजय राऊत आज सकाळी वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले
  त्यानंतर सायंकाळी सिल्व्हर ओक निवासस्थानी घेतली शरद पवारांची भेट
  गेल्या दोन दिवसात संजय राऊत यांनी दोनवेळा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
  महाविकास आघाडीत कुजबुज सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
 • 4:39 PM IST
  या राज्याने 10वी चे वेळापत्रक केले जाहीर, 19 जुलैपासून सुरु होणार परीक्षा

  कर्नाटक एसएसएलसी परीक्षा 2021
  कर्नाटकमध्ये 10वीचे वेळापत्रक जाहीर
  19 जुलै ते 22 जुलै रोजी होणार परीक्षा
  सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत होणार परीक्षा
 • 1:54 PM IST
  अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
  सोमवारी सकाळी 10.55 वाजता यशस्वी चाचणी
  क्षेपणास्त्रचं ओडिशाच्या किनारपट्टीवर परीक्षण
  या क्षेपणास्त्रामुळे लष्कराची ताकत अजून वाढणार
  अग्नि प्राइम हे क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसीत केलेय
 • 12:39 PM IST
  दहशतवादी हल्ल्यात माजी SPO आणि त्यांच्या पत्नीनंतर मुलीचाही मृत्यू
  माजी SPO फयाज अहमद यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी केला होता अंदाधुंद गोळीबार
  गोळीबारात फयाज अहमद आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू
  गंभीर जखमी झालेल्या फयाज अहमद यांच्या मुलीचाही मृत्यू
 • 12:28 PM IST
  इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणी ‘बिग बॉस मराठी’फेम अभिनेत्री हिना पांचाळला अटक

  इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण
  बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हिना पांचाळला अटक
  नाशिक पोलिसांनी हिना पांचाळसह 22 जणांना केली अटक
  अटक केलेल्यांमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्रींचा देखील समावेश
  रेव्ह पार्टीत नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचे सेवन सुरु होते
  अटक केलेल्यांमध्ये 10 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश
 • 8:36 AM IST
  मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईल – संभाजीराजे

  समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच मी सरकारशी संवाद साधला
  मी मॅनेज झालो याचा असा अर्थ काढणे चुकीचे
  मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईल
  मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी स्टंटबाजीची गरज नाही
  छत्रपती संभाजीराजे यांचे वक्तव्य
  सकल मराठा समाजातर्फे कोल्हापूरच्या भवानी मंडपात झाली बैठक
 • 8:31 AM IST
  धुळे शहरातील शंकर मार्केटला भीषण आग
  पाच कंदील चौकामध्ये आहे हे मार्केट
  आगीमध्ये लाखोंचे नुकसान
  अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी
  आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु
 • 8:25 AM IST
  ट्विटरच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याचा राजीनामा
  तक्रार निवारण अधिकारी धमेंद्र चतुर यांनी दिला राजीनामा
  चतुर यांच्या राजीनाम्यामुळे तक्रार निवारण करण्यासाठी ट्विटरकडे अधिकारी राहिला नाही
 • 8:17 AM IST
  जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी SPO आणि त्यांच्या पत्नीची केली हत्या
  जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागातील घटना
  माजी SPO फयाज अहमद यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी केला अंदाधुंद गोळीबार
  गोळीबारात फयाज अहमद आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू
  तर फयाज अहमद यांची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु
  रविवारी दहशतवाद्यांनी जम्मू एअरपोर्टवर ड्रोनने हल्ला केला
  ही घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी SPO यांच्यावर हल्ला केला
  घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली अशून सर्च ऑपरेशन केले सुरु