राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचे (Lockdown in Maharashtra) निर्बंध कडक करण्यात आहे. कोरोना रुग्णसंख्येत दररोज चढ-उतार पाहायाला मिळत आहे. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया…Also Read - Maharashtra Political Crisis: ..तर उद्धव ठाकरे गिरवणार अटलबिहारी वाजपेयी यांचा कित्ता! अविश्वास ठराव मंजूर होण्याआधीच देणार राजीनामा?

Also Read - What is Floor Test: काय असते बहुमत चाचणी? महाराष्ट्र सरकारवर का आली ही वेळ; जाणून घ्या, एका क्लिकवर...

Also Read - CM Uddhav Thackeray floor test: ठाकरे सरकारची उद्या अग्निपरीक्षा! जाणून घ्या... एकनाथ शिंदे गटात कोण-कोणते आमदार?

Live Updates

 • 10:10 PM IST
  राज्यात 8 हजार 85 नवे कोरोनाबाधित; 8 हजार 623 रूग्ण कोरोनामुक्त
  मागील 24 तासात 231 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद, मृत्यूदर 2.01 टक्के
  राज्यात आजपर्यंत 58,09,548 रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 96 टक्के
 • 7:53 PM IST
  शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
  पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये महाविकासआघाडीतील विविध मुद्यांवर सव्वा तास चर्चा
  महाविकासआघाडीतील विविध मतभेदांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती
  दोन आठवड्यांपासून महाविकासआघाडीत निर्माण झालेल्या मतभेदांना बैठकीत पूर्ण विराम दिल्याची माहिती
 • 7:41 PM IST
  डेल्टा प्लसनंतर आता ‘लॅम्ब्डा वेरियंट’चा धोका, आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा
  डब्ल्यूएचओला 15 जूनला 29 देशांमध्ये आढळला ‘लॅम्ब्डा वेरियंट’
  या वेरियंटचा संसर्ग दक्षिण अमेरिकेतून सुरु झाल्याची प्राथमिक माहिती
  ‘लॅम्ब्डा वेरियंट’ आता दक्षिण ब्राझील ते ब्रिटेनपर्यंत पसरल्याची माहिती
  न्यूज मेडिकल लाइफ साइंसमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार UK मध्ये याचा वेगाने फैलाव
  इंग्लंडमध्ये या ‘लॅम्ब्डा वेरियंट’ व्हायरसबाबत चिंता व्यक्त केल्या जात आहेत
 • 5:44 PM IST
  कोरोनाविरूद्धच्या लढ्यात भारताच्या हाती आणखी एक ‘शस्त्र’
  डीसीजीआयकडून आपत्कालीन वापरासाठी मॉडर्नाची लस आयात करण्यास परवानगी
  मोडर्नाची कोव्हिड-19 लस आयात करण्यासाठी सिप्लाला परवानगी
  भारतात आता कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन,स्पुतनिकनंतर मॉडर्नाची चौथी कोव्हिड-19 लस
 • 5:16 PM IST
  मुंबईतलं बोगस लसीकरण, मुख्य आरोपीला पोलिसांच्या बेड्या
  मुंबईतल्या बोगस लसीकरणातील मुख्य आरोपी मनीष त्रिपाठी अटकेत
  आरोपीने दिंडोशी सत्र न्यायालयात केली होती अटकपूर्व जामिनाची मागणी
  मनीषवर अनेक गंभीर आरोप असून बनावट लस पुरवल्याचा मुख्य आरोप
  बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीला पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक
  टोळीकडून मुंबईतील सुमारे 2 हजार लोकांचे बोगस लसीकरण
  आरोपींमध्ये शिवम हॉस्पिटलचे डॉक्टर शिवराज पटारिया, निता पटारिया यांचाही समावेश
 • 4:20 PM IST
  ठाकरे सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर
  गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही उत्सवावर कोरोना विषाणूचं संकट कायम
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मूर्तींसंदर्भात नियम जाहीर
  मंडळातील मूर्ती 4 फूटांची, तर घरातील बाप्पा 2 फुटांचा असावा
 • 1:41 PM IST
  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अटक टाळण्यासाठी ईडीला लिहिलं पत्र
  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब घेण्याची देशमुख यांनी विनंती
  अनिल देशमुख यांना ईडीनं चौकशीचे समन्स बजावले आहेत.
  अनिल देशमुख हजर राहणार का? की चौकशीसाठी आल्यावर त्यांना अटक तर होणार नाही, चर्चेला उधाण
  अटक टाळण्यासाठी अनिल देशमुख कोर्टात धाव घेण्याची शक्यता

 • 9:23 AM IST
  उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मातर प्रकरणाचं ‘बीड’ कनेक्शन; ATSकडून एकाला अटक
  – उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शन उजेडात
  – बीडमधील इरफान शेखला अटक
  – इरफान शेख हा केंद्रीय बाल कल्याण मंत्रालयातील कर्मचारी
  – उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांत कुमार यांचा पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा
  – आतापर्यंत जवळपास एक हजारांहून जास्त लोकांचं केलं धर्मांतरण
 • 8:31 AM IST
  अनिल देशमुखांना ईडीनं पुन्हा बजावले समन्स, हजर राहण्याचे आदेश
  -राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ
  -अनिल देशमुख यांना ईडीनं पुन्हा एकदा समज बजावले आहेत.
  -अनिल देशमुखांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
  -अनिल देशमुख ईडी चौकशीला हजर राहणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे
 • 7:51 AM IST
  श्रीनगरमध्ये चकमक; पाकिस्तानी दहशतवादी आणि लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबरारचा खात्मा
  -जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील मलोरा पारिमपोरा भागात सोमवारी संध्याकाळपासून दशहदवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरू
  – पाकिस्तानी दहशतवाद्याचा आणि लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडर अबरारचा खात्मा पोलिस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना यश
  -काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिली माहिती
  – या चकमकीत एक पोलिस उपनिरीक्षक आणि सीआरपीएफचा जवानही जखमी झाला
  -हायवेवर काही दहशवादी हल्ला करणार असल्याची माहिती मिळाली. नंतर सीआरपीएफ आणि पोलिसांनी हायवेवर नाकाबंदी केली