महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूचे 21 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि जनतेच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. डेल्टा प्लस विषाणूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून येत्या दोन दिसवात नवीन नियमावली जाहीर केली जाणार आहे. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया…Also Read - शिवसेना नेते अर्जुन Arjun Khotkar यांच्यावर ईडीची कारवाई, जालन्यातील कारखान्याची 200 एकर जमीन जप्त

Also Read - Virat Kohli Corona Positive: टीम इंडियाची चिंता वाढली! विराट कोहलीला कोरोनाची लागण

Also Read - Maharashtra Corona Update: चिंता वाढली! राज्यात 4004 नवीन रुग्णांची नोंद, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

Live Updates

 • 7:41 PM IST
  मुंबईत बोगस कोरोना लसीकरण, महापालिकेची हायकोर्टात कबुली
  मुंबईत बोगस कोरोना लसीकरण झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती
  मुंबईत 2 हजार 53 जणांचे बोगस लसीकरण झाल्याची महापालिकेने कोर्टात कबुली दिली
  खरमरीत शब्दात मुंबई हायकोर्टानं मुंबई महापालिकेची केली कानउघडनी
  बोगस लसीकरण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा- हायकोर्ट
  कांदिवली, बोरिवली, वर्सोवा, खार मध्ये ठिकाणी ही बनावट लसीकरण शिबिरे
  मुंबई चार ते पाच ठिकाणी बोगस लसीकरण झालं मात्र, कोणालाच माहिती नाही
 • 3:22 PM IST
  पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील तोडक कारवाईला स्थगिती
  न्यायालयाने तोडक कारवाईला दिली स्थगिती
  आंबिल ओढ्यालगत असेलली घरं पाडण्याची कारवाई सकाळपासून होती सुरु
  कारवाईला स्थानिकांनी केला होता विरोध
  पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात सुरु होती कारवाई
 • 3:02 PM IST
  सचिन वाझे प्रकरणावरुन भाजप आक्रमक, अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी

  सचिन वाझे प्रकरणावरुन भाजप आक्रमक
  उपमुख्यमंत्री अजित पवारांची सीबीआय चौकशीची मागणी
  अजित पवारांसोबत अनिल परब यांच्या देखील चौकशीची मागणी
  अजित पवारांच्या चौकशीची मागणी करणारा प्रस्ताव मंजूर
  भाजपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत प्रस्ताव मंजूर

 • 2:57 PM IST
  पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के
  3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचे बसले धक्के
  नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिली माहिती
  कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही
 • 12:33 PM IST
  डेल्टा प्लसमुळे देशात पहिल्या बळीची नोंद, मध्य प्रदेशमध्ये महिलेचा मृत्यू

  डेल्टा प्लसमुळे देशात पहिल्या बळीची नोंद
  मध्य प्रदेशमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद
  डेल्टा प्लसमुळे देशात चिंतेचे वातावरण
  मध्य प्रदेशमध्ये डेल्टा प्लसचे एकूण 5 रुग्ण
  यातील 4 जण बरे झाले तर एकाचा मृत्यू
 • 11:27 AM IST
  जयंत पाटील यांचा आजपासून मराठवाड्यात परिवार संवाद दौरा

  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आजपासून मराठवाडा दौरा
  मराठवाड्यात राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याला आजपासून होणार सुरूवात
  धनंजय मुंडे हे देखील या दौ-यात होणार सहभागी
  तुळजापूर येथून या दौ-यावर होणार सुरुवात
  4 जुलैपर्यंत हा दौरा असणार
  मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात ते जाणार
 • 10:17 AM IST
  जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी बोलावली बैठक
  दिल्लीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची पंतप्रधानांसोबत होणार बैठक
  जम्मू-काश्मीरमधील 14 नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रण
 • 10:11 AM IST
  डोळ्याला उंदीर चावलेल्या रुग्णाचा मृत्यू
  घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातील घटना
  उपचारादरम्यान रुग्णाला चावला होता उंदीर
  रुग्णाच्या मृत्यूचा उंदीर चावल्याच्या घटनेशी संबंध नाही
  रुग्णालयात दाखल झाल्यापासूनच रुग्णाची प्रकृती होती गंभीर
  राजावाडीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांची माहिती
 • 10:05 AM IST
  मुंबईतील डेल्टा प्लसचे दोन्ही रुग्ण कोरोनामुक्त
  एप्रिल महिन्यात आढळले होते हे दोन रुग्ण
  मुंबईत सध्या डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही
  पालिका प्रशासनाने दिली माहिती