कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) डेल्टा व्हेरिएंटनं (Delta Variant) मुंबईसह ठाण्यात धडक दिली आहे. राज्यातील रुग्ण संख्या 45 वर पोहोचल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्यात मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईकरांना येत्या 15 ऑगस्टपासून लोकल रेल्वेने (Mumbai Local Train Updates) प्रवास करता येणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात दोन्ही डोस घेऊन 14 दिवस झालेल्यांना प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Shiv sena- Bjp Alliance: मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Also Read - Breaking News Live Updates: PM मोदींच्या वाढदिवशी लसीकरण अभियानाचा रेकॉर्डब्रेक, 2 कोटी लोकांना दिली लस
Also Read - Gujarat New CM Bhupendra Patel: जनमाणसात ‘दादा’ नावानं प्रचलित, कोण आहेत गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री

Live Updates

 • 10:29 PM IST
  काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीचाही राज्यात स्वबळावर लढण्याचा नारा
  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले संकेत
  निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही
  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत नवाब मलिकांचं मोठं वक्तव्य
  स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार – मलिक
 • 8:07 PM IST

  दहशतवाद्यांकडून भाजप नेत्यासह त्याच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या
  भाजप नेता गुलाम रसूल दार आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या
  जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील धक्कादायक घटना
  गुलाम रसूल डार कुलगाम इथले भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष आणि सरपंच
  दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू

 • 2:22 PM IST
  अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर, 16 ऑगस्टपासून करता येईल अर्ज
  अकरावी प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर
  विद्यार्थ्यांसह पालकांमधील संभ्रम दूर
  16 ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज करता येणार
  विद्यार्थ्यांना तत्पूर्वी मॉक डेमोची सुविधा उपलब्ध
  ही सुविधा 13 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असणार
  या कालावधीत विद्यार्थ्याना प्रवेश अर्ज कसा भरायचा याचा सराव करता येणार
 • 10:25 AM IST
  मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा हालचाली सुरु, पुण्यात आज राज्यस्तरीय बैठक

  सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना देणार
  सोमवारी पुण्यात मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडणार
  बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार
  बैठकीला मराठा अभ्यासकासह कायदेतज्ज्ञही उपस्थित राहणार
  102 व्या घटनादुरुस्तीसंदर्भात चर्चा होणार, चर्चेनंतर संभाजीराजे छत्रपती पत्रकारपरिषदेत पुढची भूमिका मांडणार
 • 9:38 AM IST
  गोव्यात कोविड-19 कर्फ्यूत पुन्हा वाढ, 16 ऑगस्टपर्यंत कठोर निर्बंध

  गोवा सरकारकडून कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्फ्यूत पुन्हा एकादा वाढ
  16 ऑगस्टपर्यत कठोर निर्बंध राहणार
  राज्य सरकारनं आधी 9 ऑगस्टपर्यंत कर्फ्यू लागू केला होता
  राज्यात रविवारी कोरोनाचे 69 नवे रुग्ण आढळून आले
  देशातील काही राज्यासह गोव्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे.
 • 8:15 AM IST
  पंतप्रधान नरेंद्र मोदी,10 ऑगस्ट रोजी ‘उज्ज्वला 2.0’ योजनेला प्रारंभ करणार
  उत्तर प्रदेशातील महोबा येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, एलपीजी कनेक्शन देऊन उज्ज्वला 2.0 योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ करणार
  पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत तसेच राष्ट्राला संबोधितही करणार
  उज्ज्वला योजना 1.0 (पहिला टप्पा) ते उज्ज्वला 2.0 (दुसरा टप्पा) प्रवास
  2016 मध्ये सुरू झालेल्या उज्ज्वला 1.0 (पहिल्या टप्प्यात) योजनेदरम्यान, दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 5 कोटी महिला सदस्यांना एलपीजी कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं
  त्यानंतर, एप्रिल 2018 मध्ये या योजनेचा विस्तार करत आणखी सात श्रेणींमधील अशा महिला लाभार्थींमध्ये समावेश
  8 कोटी एलपीजी जोडणीचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं. हे उद्दिष्ट निर्धारीत तारखेच्या सात महिने अगोदर ऑगस्ट 2019 मध्येच साध्य झालं.
  आर्थिक वर्ष 21-22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अतिरिक्त एक कोटी एलपीजी जोडणीची तरतूद जाहीर
  कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना डिपॉझिट-मुक्त एलपीजी जोडणी देण्याच्या उद्देशाने देण्यात आली.