राज्यासह देशामध्ये कोरोनामुळे नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेणार आहोत. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Mumbai Local Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी

Also Read - Mumbai Local Update: 28 ऑक्टोबरपासून मुंबईची लाईफलाईन पूर्ण क्षमतेने धावणार, मध्य-पश्चिम रेल्वेवर 100 टक्के लोकल फेऱ्या!
Also Read - Breaking News Live Updates: NCBच्या बॉलिवूडवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार : नवाब मलिक

Live Updates

 • 10:57 PM IST
  संरक्षण क्षेत्रामध्ये भारताने गाठला आणखी एक मोठा पल्ला
  अत्याधुनिक शक्तिशाली आकाश प्राइम क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी
  आकाश प्राइममध्ये शत्रूला अचूक लक्ष्य करण्याची क्षमता
  विद्यमान आकाश प्रणालीपेक्षा आकाश प्राइम अधिक शक्तीशाली
 • 9:19 PM IST
  आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या तारखां अखेर जाहीर
  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्या परीक्षांच्या तारखा
  येत्या 24 ऑक्टोबरला ‘क’ गट भरती परीक्षा तर 31 ऑक्टोबरला ‘ड’ गट भरती परीक्षा
  9 दिवसांपूर्वी हॉल तिकीट दिलं जाणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती
 • 3:47 PM IST
  अखेर भाजपची माघार! राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा

  राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा
  भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांची माघार
  काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या सदस्यपदाच्या जागेसाठी होत आहे पोटनिवडणूक
  काँग्रेसकडून रजनी पाटील यांना दिली उमेदवारी
  पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडी आधीपासून होती प्रयत्नशील
 • 2:41 PM IST
  प्रचाराचा अखेरचा दिवस: ममता बॅनर्जीच्या पराभवासाठी BJP चे तब्बल 80 नेते मैदानात

  पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस
  तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात काट्याची लढत
  ममता बॅनर्जी आपल्या समर्थकांसह प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्या
  भाजपचे तब्बल 80 नेते पक्षाच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांच्या प्रचारासाठी मैदानात
  30 सप्टेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान
  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2011 आणि 2016 मध्ये येथूनच जिंकली होती निवडणूक
  भवानीपूर मतदार संघ हा ममता बॅनर्जींचा जुनाच मतदारसंघ
 • 1:11 PM IST
  शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची प्रकृती खालवली, रुग्णालयात केले दाखल

  सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत 980 कोटींचा घोटाळा प्रकरण
  आनंदराव अडसूळ यांना ईडीकडून समन्स
  मुंबईतील कांदिवलीच्या घरावर ईडीचा छापा
  ईडी घरी पोहचतात अडसूळांची तब्येत खालवली
  गोरेगाव येथील लाईफ लाईन मेडीकेअर रुग्णालयात दाखल
 • 10:12 AM IST
  कृषी कायद्याच्या विरोधात भारत बंदला सुरुवात, राष्ट्रवादी-काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेने दिला पाठिंबा

  कृषी कायद्याच्या विरोधात भारत बंदला सुरुवात
  बंदला राजकीय पक्षांसह शेतकरी संघटनांनी दिला पाठिंबा
  राष्ट्रवादी-काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेने दिला पाठिंबा
  दुकाने बंद ठेवण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन
  शेतकरी रास्तारोको आणि रेलरोको करणार आहेत
  पंजाब- हरियाणा दरम्यान शेतकऱ्यांनी शंभू सीमा केली बंद
  सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत रस्ते अडवून करणार निषेध
 • 10:05 AM IST
  मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले

  मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात
  इंदोर-पुणे रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले
  दोन डबे रुळावरुन घसरले
  लोणावळा रेल्वे स्टेशनजवळ घडली घटना
  सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही
  मुंबईवरुन पुण्याकडे जात होती रेल्वे
 • 10:03 AM IST
  शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांना ईडीचा समन्स

  आनंदराव अडसुळ यांना ईडीचा समन्स
  ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
  पण अडसुळ दिल्लीला जाणार असल्याणे हजर राहणार नाहीत
 • 7:42 AM IST
  गुलाब चक्रीवादळामुळे दोन मच्छिमारांचा मृत्यू

  गुलाबी चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले
  या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशमध्ये दोन मच्छिमारांचा मृत्यू
  एक मच्छिमार अद्याप बेपत्ता, त्याचा शोध सुरु
  हे तीन मच्छिमार मासेमारीसाठी गेले होते
  ते किनाऱ्यावर सुरक्षितपणे येऊ शकले नाहीत