देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - ST Bus Fare Hiked: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! एसटी प्रवास महागला, जाणून घ्या तिकिटांचे नवे दर

Also Read - Breaking News Live Updates: NCBच्या बॉलिवूडवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार : नवाब मलिक
Also Read - NEET MDS Counselling 2021 : NEET MDS उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी, सुप्रीम कोर्टाकडून काउन्सिलिंगवर तात्पुरती स्थगिती

Live Updates

 • 9:42 PM IST

  पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ, नवज्योतसिंग सिद्धू यांचा राजीनामा स्विकारला नाही

  नवज्योतसिंग सिद्धूंनी यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबच्या राजकारणात वेगवान घडामोडी
  सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर रजिया सुल्ताना यांनीही मंत्रिमंडळातून दिला राजीनामा
  पंजाबचे आणखी बरेच नेते सिद्धूच्या समर्थनासाठी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती
  रझिया सुल्ताना यांच्यासोबतच योगेंद्र धिंग्रा यांनीही दिला प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा
  सिद्धू यांचे समर्थक असलेले काँग्रेसचे राज्य कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल यांचाही राजीनामा
  मात्र काँग्रेस हाय कमांडने सिद्धू यांचा राजीनामा स्विकारला नसल्याची एएनआयची माहिती

 • 4:45 PM IST

  पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप

  नवज्योतसिंग सिद्धूींनी दिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
  गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये राजकीय नाट्यमय घडामोडी सुरू
  अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच दिला मुख्यमंत्रीपदा राजीनामा
  त्यानंतर पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांचाही राजीनामा
  राजीनामा दिला तरी आपण काँग्रेसमध्येच राहणार : नवज्योतसिंग सिद्धू

 • 1:42 PM IST
  मला ईडीचं समन्स मिळालं, चौकशीपूर्वी नेमकं काय म्हणाले अनिल परब?
  मी कुठलंही चुकीचं काम केलं नाही, ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार
  राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची प्रतिक्रिया
  मी शिवसेनाप्रमुख आणि माझ्या मुलीची शपथ आधीच घेतलीय
  मला ईडीचं दुसरं समन्स मिळालंय
  कोणत्या कारणासाठी बोलावलय याची कल्पना नाही
  माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही
 • 11:28 AM IST
  अतिउत्साही एसटी बस चालकाचा प्रताप, पुराच्या पाण्यात बस गेली वाहून
  यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड इथल्या दहागावजवळील धक्कादायक घटना
  एसटीमध्ये चार ते सहा प्रवाशी असल्याची माहिती
  उमरखेडवरून पुसदला जात होती एसटी बस
  रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे दहागावच्या पुलावर पाणी आलं होतं
 • 9:19 AM IST
  औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होण्याचे संकेत
  शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादच्या भाजप शहाराध्यक्ष संजय केनेकर यांची घेतली भेट
  भाजप-शिवसेना युतीसाठी अब्दुल सत्तार सक्रिय झाल्याची चर्चा
  काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तारांनी घेतली होती केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांची भेट
  गेल्या 30 वर्षे औरंगाबाद महापालिकेवर भाजप-शिवसेना युतीची सत्ता
 • 8:01 AM IST
  सत्तेच्या खेळात तरूण डॉक्टरांचा फुटबॉल करू नका, सुप्रीम कोर्टानं मोदी सरकारला फटकारलं
  सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला कठोर शब्दांत खडसावले
  नीट सुपर स्पेशालिटी परीक्षेच्या अभ्यासक्रमात आयत्यावेळी बदल केल्यानं कोर्ट नाराज
  लसीकरणाचा मुद्दा असो वा ऑक्सिजन पुरवठ्याचा, सुप्रीम कोर्टाकडून सरकारची कानउघाडणी
  सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेची देशातल्या न्यायिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा
  एका आठवड्यात बैठक घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
  जेईई अॅडव्हान्स्ड 2021 परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध
  उमेदवारांनी ही प्रवेशपत्रं वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करता येणार
  जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा 3 ऑक्टोबरला देशातील विविध केंद्रांवर घेतली जाणार