महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाने हाहाकार माजवला होता. पण आता पावासाने थोडी विश्रांती घेतली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे नुकसान झाले होते ते आता हळूहळू सावरत आहेत. सध्या मुख्यमंत्री पूरग्रस्त भागांच पाहणी करत आहेत. ते कोल्हापूर-सांगलीमध्ये नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. देशासह राज्यात कोरोनाची नेमकी काय परिस्थिती आहे. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Shweta Tiwari Birthday : श्वेता तिवारीला पहिल्या कामाचे मिळाले होते 500 रुपये, कमी वयात झालं होतं लग्न पण....

Also Read - गोल्डन आणि सिल्वर कलरच्या ड्रेसमध्ये Tamannaah Bhatia चे बोल्ड फोटोशूट!

Also Read - Salman Khan च्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात होणार Ram Charan ची एन्ट्री!

Live Updates

 • 9:19 PM IST

  “वेळ आली तर शिवसेना भवनही तोडू” भाजप आमदार प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य
  माहीममध्ये राजा बढे चौकात भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटनप्रसंगी प्रसाद लाड यांचं वक्तव्य

 • 8:29 PM IST

  पश्चिम बंगालचे भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांचा राजीनामा,
  बाबुल सुप्रियो राजकारणातून सन्यास घेण्याचा निर्णय
  फेसबुकवर एक पोस्ट लिहून केली आपल्या निर्णयाची घोषणा
  मी माझे शासकीय निवसस्थान महिनाभरात सोडेन : बाबुल सुप्रियो

 • 4:52 PM IST

  टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी पी व्ही सिंधुचं आव्हान संपुष्टात
  उपांत्य फेरीत चीनच्या ताइ त्झू-यिंगकडून 21-18, 21-12 ने पराभूत
  पी व्ही सिंधु आता कांस्य पदकासाठी लढणार

 • 3:43 PM IST
  मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, तानसा-मोडकसागर धरण ओव्हरफ्लो

  मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली
  तानसा-मोडकसागर धरण ओव्हरफ्लो
  वर्षभराची पाण्याची चिंता मिटली
  धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस
  पाणी पुरवठा विभागाने दिली माहिती
 • 3:06 PM IST
  आसाम-मिझोरम सीमावाद चिघळण्याची शक्यता, आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल

  आसाम-मिझोरम सीमावाद चिघळण्याची शक्यता
  आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात गुन्हा दाखल
  आसामच्या चार वरिष्ठ अधिकारी आणि अन्य लोकांविरोधातही गुन्हा दाखल
  मिझोरमच्या कोलसिब जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार प्रकरण गुन्हा दाखल
 • 2:14 PM IST
  जम्मू-काश्मीरमध्ये जवानांची मोठी कारवाई, दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

  जम्मू-काश्मीरमध्ये जवानांची मोठी कारवाई
  दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा
  पुलवामामधील दचीगाम जंगलात झाली चकमक
  जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु
 • 9:23 AM IST
  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात तिसरा गुन्हा दाखल

  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल
  ठाणे नगर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल
  आतापर्यंत परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबईत एक आणि ठाण्यात दोन गुन्हे दाखल
 • 8:38 AM IST
  राज्यात 24 तासांत 6,600 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  24 तासांत 231 करोनाबाधितांचा मृत्यू
  दिवसभरात 7,431 रूग्ण करोनामुक्त
 • 8:34 AM IST

  पुण्यातील व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांनी दिले आदेश

  पुण्यातील व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी होणार
  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आदेश
  एका महिला पोलिस अधिकाऱ्याची आहे ही क्लिप
  महिला पोलिस अधिकारी एका पोलिस कर्मचाऱ्याला फुकटात बिर्याणी आणण्यास सांगते
  हॉटेल आपल्याच हद्दीत येत असल्याने पैसे देण्याची गरज नाही असे ती म्हणतेय