तुम्ही कोविडची लस घेतलीय का ?. लस लवकर घ्या… कारण लस घेतली नाही तर पगार मिळणार नाही
20 जुलैपर्यंत लस घ्या, नाही तर पगार विसरा, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी काढला फतवा
लस घ्या, लस घ्या अशा वारंवार सूचना देऊनही कर्मचारी ऐकत नसल्यानं अनोखा फंडा शोधला
पिंपरी चिंचवड महापालिकेंतर्गत 7 हजार 479 अधिकारी, कर्मचारी, शिक्षक काम करतात.
तिसऱ्या लाटेपूर्वी या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी काढला फतवा
कर्मचारी महासंघाकडून आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत