राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यासह देशामध्ये कोरोनामुळे नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेणार आहोत. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Aadhaar-PAN कार्डशी लिंक करण्याची डेडलाइन वाढवली, जाणून घ्या कधी आहे शेवटची तारीख!

Also Read - दिलासादायक! 86 टक्के मुंबईकरांमध्ये सापडल्या कोरोनाच्या अँटीबॉडीज, 5व्या सेरो सर्वेक्षणातून माहिती समोर
Also Read - Breaking News Live Updates: पंजाबमध्ये राजकीय उलथापालथ, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Live Updates

 • 4:54 PM IST
  प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आणि डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडवालाचा मृत्यू

  युसूफ लकडवालाचा आर्थर रोड कारागृहात झाला मृत्यू
  मृतदेह जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला
  नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल
 • 3:49 PM IST
  मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सव काळात जमावबंदीचे आदेश
  पुण्यापाठोपाठ मुंबईतही गणेशोत्सव काळात जमावबंदी आदेश लागू
  पुढील 9 दिवस कलम 144 लागू, मुंबई पोलिसांकडून आदेश जारी
  सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित फिरता येणार नाही
  गणेशोत्सवात कोणत्याही मिरवणुकांना परवानगी नाही
  राज्य सरकारनं जाहीर केल्याप्रमाणे प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध
  नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये अन्यथा कारवाई
  भाविकांना आता ऑनलाईनच दर्शन घ्यावे लागणार
 • 2:54 PM IST
  साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

  साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
  दोन्ही नेत्यांच्य कार्यकर्त्यांमध्ये सशस्त्र हाणामारी
  या घटनेमुळे साताऱ्यात उडाली एकच खळबळ
  उदयनराजे समर्थकाने शिवेंद्रराजेंच्या समर्थकाच्या ऑफिससमोर गाडी लावल्याने झाला वाद
  हाणामारीत सहा जण गंभीर जखमी
 • 12:42 PM IST
  राज्यसभेतील सहा रिक्त जागांसाठी 4 ऑक्टोबरला होणार पोटनिवडणूक

  राज्यसभेतील सहा रिक्त जागांसाठी होणार पोटनिवडणूक
  निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा
  4 ऑक्टोबरला होणार पोटनिवडणूक
  राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरही होणार पोटनिवडणूक
 • 12:35 PM IST
  चिंता वाढली! मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत होतेय वाढ

  मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत होतेय वाढ
  बुधवारी 532 नव्या रुग्णांची नोंद
  जुलैनंतर नवीन प्रकरणांमध्ये ही सर्वात मोठी वाढ
  तर बुधवारी 65 जणांचा कोरोनाने मृत्यू
 • 8:59 AM IST
  सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

  चिपी विमानतळ लवकरच सुरु होणार
  केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थित होणा कार्यक्रम
  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती